महाविकास आघाडीच्या बैठकीला सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे-बहादुरभाई
रेल्वेजमीन अधिग्रहण:इंडिया आघाडीची उद्या बैठक
महाविकास आघाडीच्या बैठकीला सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे-बहादुरभाई
परळी, प्रतिनिधी....
परळी शहरातील सर्वे नंबर 75 मधील वास्तव्यात असलेल्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने परळी-परभणी रेल्वे मार्ग दुहेरी करणयासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा घाट घातला असुन या विषयी परळी शहरातील महाविकास आघाडीची आज बुधवार दि.10 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय,नेहरू चौक येथे आयोजित केली आहे.या महत्वपुर्ण बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केले आहे.
काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयात होणाऱ्या बैठकीला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख सह महाविकास आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.बैठक संपताच परळी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करुन निवेदन देण्यात देण्यात येणार असुन रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली आझादनगर,मिलिंद नगर, बरकत नगर,गंगा सागर नगर इत्यादी जागा अधिग्रहण करण्यासाठी अधिसूचना काढुन घातलेला घाट त्वरित थांबवावा अन्यथा या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.तरी या महत्वपुर्ण बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केले आहे.
--------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा