#mbnews# 'विधानसभेला पुरे पाडा' चा फटका कोणाला बसणार?

 लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही 'पुरे पाडा' चे शस्त्र - जरांगे-पाटलांचे बीडमधून सूचक वक्तव्य

बीड, प्रतिनिधी.....
           बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही कोणालाच घाबरत नाहीत.आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे  ठणकावून सांगत लोकसभेप्रमाणे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून  येऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी  मराठा समाजाला केले.
          मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये आज शांतता रॅलीला संबोधीत केले. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती.आता जरांगेंनी पुन्हा एकदा 'विधानसभेला पुरे पाडा' असे आवाहन समाजाला केले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या शांतता रॅलींनी संपुर्ण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आज बीड येथे झालेल्या शांतता रॅलीत तुफान गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

विधानसभेला पुरे पाडा
------------------------

बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही भित नाहीत,आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे जरांगे यांनी ठणकावून सांगितलं. त्यामुळे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून  येऊ देऊ नका, असे आवाहनच त्यांनी उपस्थित मराठा समाजाला केले.  

सगेसोयरे आणि सरसकट आरक्षण द्या
-------------------------
            मराठा आणि कुणबी हा एकच असल्याचा उल्लेख केला. हैदराबादला त्याच्या नोंदी सापडल्या आहे. सगेसोयरे आणि सरसकट आरक्षण द्या ही आपली मागणी कायम आहे असेही ते यावेळी म्हणाले. मराठा समाजाचे दुख: ना महायुतीला दिसत आहे ना महाविकास आघाडीला. तु मारल्या सारखं कर आणि मी रडल्या सारखं करतो असं सध्या सुरू आहे असेही ते म्हणाले.

तर पुन्हा मुंबईच्या दिशेने यावे लागेल
------------------------

 गेली 70 वर्षे पुढाऱ्यांना आम्हीच मोठं केलं. त्यांची मुलंबाळ आमदार मंत्री झाले. पण मराठा समाज तिकडेच आहे. त्याला आता हक्काचे आरक्षण हवे आहे. त्यांना अधिकारी व्हायचे आहे. त्यामुळे सरकारने वेळीच निर्णय घेतला पाहीजे. सरकारला मुदत दिली आहे. त्या मुदतीत त्यांनी हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर तसे झाले नाही तर पुन्हा मुंबईच्या दिशेने यावे लागेल असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे.

जाती पेक्षा कोणी मोठा नाही
--------------------
जाती पेक्षा आपल्याला समोर कोणी मोठा नाही. फडणवीस हे भुजबळांना हाताशी धरून काम करत आहेत. त्यामुळे भाजप संपत चालली आहे. त्यामुळे मराठा समाजाने एकसंघ राहीलं पाहीजे. मतदान मोठ्या प्रमाणात करा असे जरांगे यांनी सांगितले. 

'विधानसभेला पुरे पाडा' चा फटका कोणाला बसणार?
-------------------------------

लोकसभेला 'पाडा' असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले होते. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसला. महायुतीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. खास करून मराठवाड्यात भाजपच्या उमेदवारांना दारूण पराभव स्विकारावा लागला. आता जरांगेंनी पुन्हा एकदा 'विधानसभेला पुरे पाडा' असे आवाहन समाजाला केले आहे. त्यांच्या या आवाहानाचा फटका कोणाला बसणार हे येत्या काळात बघावे लागणार आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?