23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

#mbnews# >>>>बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 गुटखा पकडला : एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत 

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 


दिंद्रुड, प्रतिनिधी... 


माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या संशयित कंटेनरला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान भोपा पाटी वर पकडले असता जवळपास एक कोटी रुपयांचा राज निवास पानमसाला गुटखा आढळून आला. दिंद्रुड पोलीस  स्टेशनला कंटेनर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती. 

      गोपनीय माहितीच्या आधारे तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या एका कंटेनरला स्थानिक गुन्हे शाखेचा दोन पथकांनी पकडत दिंद्रुड पोलीस स्टेशनला आणले असता जवळपास 75 लाख रुपयांचा राजनिवास पानमसाला नावाचा गुटखा व अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती. 


बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान चांद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे सुशांत सुतळे, पो.हे.कॉं. शेख नसीर अशोक दुबाले कैलास ठोंबरे राजू पठाण मारुती कांबळे अर्जुन यादव वाहन चालक गणेश मराडे, अतुल हराळे यांनी ही कारवाई केली.कंटेनर चालक विद्या राम शामलाल रा.निनवाया अचनेर, आग्रा, उत्तर प्रदेश यास दिंद्रुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?