MB NEWS:संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना
संत भगवानबाबा पालखी सोहळा मंगळवारी पाटोद्यात; संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना
पाटोदा/अमोल जोशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग यांच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाटोद्यातून शेकडो दिंड्या व हजारो भाविक पाटोदा शहरातून रवाना झाले असून शेवटचा भगवानगड येथून येणारा भगवान बाबा पालखी सोहळा पाटोदा येथे उद्या सकाळी दहा वाजता शहरात दाखल होणार आहे.
शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य दिव्य स्वागत होईल या नंतर बस स्टँड , बाजारतळ मार्गे हा पालखी सोहळा भामेश्वर मंदिरात दाखल होऊन तिथे दर्शन सोहळा होणार आहे सर्व वारकऱ्यांची जेवणाची सोय कन्या शाळा नगरपंचायत जवळ येथे केलेली आहे भगवान बाबांच्या पादुका दर्शना साठी व स्वागतासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक सकाळीच पाटोद्यात दाखल होतात, दुपारी हा सोहळा दीघोळ कडे प्रस्थान करणार आहे. आषाढी वारी निमित्त महाराष्ट्रातील हजारो दिंड्या पंढरपूर येथे येतात त्यापैकी पंढरपूरमध्ये येणाऱ्या मानाच्या नऊ दिंड्या असतात त्या दिंड्यांमध्ये पैठण येथून निघणारी संत एकनाथ महाराजांची तर संत ज्ञानेश्वराच्या जन्म गाव आपेगाव येथून येणारी ज्ञानेश्वर महाराजांची महाराजाची पालखी व भगवानगड येथून येणारी भगवान बाबाची पालखी या तीनही पालख्या पाटोदा शहरातून मार्गस्थ होतात.
Click: विधानसभा लढवणारच- राजाभाऊ फड
या तीनही पालख्यांना पंढरपूर मध्ये मानाच्या असलेल्या नऊ पालख्या पैकी तीनही पालख्याना वाखरी येथे होणाऱ्या रिंगण सोहळ्यानंतर पंढरपूर मध्ये दाखल होण्याचे मान आहेत. या तीन मोठ्या पालख्यासह शहरातून शेकडो दिंड्या व त्यातून हजारो वारकरी पंढरपूरसाठी रवाना होतात यावेळी पाटोदा शहरांमध्ये सात दिवस येणाऱ्या सर्व वारकऱ्यांची जेवणाची निवासाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते .
Click:■ महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार!
आषाढी साठी शेवटची पालखी ही भगवान बाबाची पाटोदा शहरातून जात असते या येणाऱ्या सर्व पालख्यांचे पाटोदा शहरात मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात स्वागत केले जाते यंदा हा स्वागत सोहळा डीजे बँड टाळ मृदंग तर स्वागतासाठी क्रेनने हार घालण्यात आले गेल्या आठ दिवसापासून पाटोदा शहर हे भक्तिमय वातावरणात दिसून येत आहे.
पाण्यावर बैसुनी वाचली ज्ञानेश्वरी......
राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा जन्म हा पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील असून संपूर्ण जगभरात बाबांची ख्याती असून विहरीतील पाण्यावर पंचा टाकून बाबांनी ज्ञानेश्र्वरी वाचली होती, पाटोदा तालुका ही बाबांची जन्मभूमी असल्याने पाटोदा तालुक्यातील जवळपास सर्व गावातून बाबांचे भक्त पालखीच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी येतात व पाटोदा येथून अनेक वारकरी पालखी सोबत पंढरपूरकडे रवाना होतात.
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांचे पाटोदा हे जंक्शन....
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांचे पाटोदा हे जंक्शन झाले आहे खानदेश, जळगाव ,अमरावती, सह मराठवाडा व महाराष्ट्रातील अनेक दिंडी पाटोदा शहरातून पालखी मार्गाने पंढरपूर कडे रवाना होतात. मात्र पालखी मार्गाच्या अर्धवट रस्ता कामामुळे वारकऱ्यांचे पायी चालताना हाल होत आहेत.
गावोगावी स्वागत....
पैठण ,आपेगाव, भगवानगड ,जळगाव ,अमरावती, येथून पंढरपूर साठी रवाना होणाऱ्या दिंड्यांची शेकडो वर्षाची परंपरा असून पाटोदा तालुक्यातून या सर्व दिंड्याचे मोठ्या प्रमाणात आदर ,स्वागत गावोगावी केले जाते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा