भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकरी ठार

 भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दिंडीतील वारकरी ठार



  शुक्रवारी सायंकाळी तेलगाव येथे घडला अपघात 

धारूर, प्रतिनिधी....

                खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर भरधाव अज्ञात वाहनाने दिंडीतील वारकऱ्या धडक दिल्याने झालेल्या अपघातात वारकरी जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

      सेलु तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिंडी चालली होती.या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत. ही दिंडी दि.३\७\२०२४ बुधवारी लाडनांद्रा येथुन निघाली होती.सदर दिंडी शुक्रवार दि.५रोजी तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती.दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडुन भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले.त्यांच्या डोक्यास जबर मार लागून रस्त्यावर रक्त सांडले होते.अपघाताची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश साळुंके, बालाजी सुरेवाड आदि  हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर हा अपघात घडुन यात वारकरी जागीच ठार झाल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार