कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे

 बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून परळीतील 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे वाटप




कामगार मंडळाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वाटप करावे - प्रा.बी.जी.खाडे


 परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

         बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेने (लालबावटा) नोंदी केलेल्या 113 बांधकाम कामगारांना गृहउपयोगी संचाचे (भांडे) मंडळाकडून बीड येथे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना सुरक्षा(पेटी) व गृहउपयोगी संच(भांडे) मोफत वाटप केली जातात. यापूर्वी पेट्या व गृहउपयोगी संच तालुक्याच्या ठिकाणी किवा कामगारांच्या राहत्या गांवात आणून दिले जात होते. परंतू कामगारांची फार लूट होत आहे म्हणून मंडळाने जिल्हा ठिकाणीच पेट्या व भांडे कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे असे अधिकाऱ्यांकडून बोलते जाते.

          गृहउपयोगी संच आणणे प्रत्येक कामगाराम अत्यंत त्रासदायक आहे.संच वाटप केंद्र बीडपासून आठ किलोमीटर दूर आहे व रिक्षा किमान 500 रु. घेतो. जिल्हयातील बांधकाम कामगारांना संच मिळण्यासाठी तालुक्याप्रमाणे वार ठरवून दिले आहेत परंतू जिल्ह‌यातील सर्व ठिकाणचे कामगार रोज येतात. आलेले कामगार कोणाचेच ऐकत नाहीत. वाटप कंत्राटदार हातबल आहे. कोणत्याही अधिका-याचा कसलाच प्रभाव नाही व कामगार ऐकतच नाहीत. संघटनेने परळीतून मोठे टेम्पो भरून 110 कामगार बीडला नेले होते, कामगार घरून सकाळी ८ वाजता निघाले व रात्री ११ वाजता परळीत आले. कामगारांना त्यांच्या जवळची भाकरी खाता आली नाही.कामगारांबरोबर प्रा. खाडे, शेख जावेद, शेख अजहर, शेख नवीद, प्रकाश वाघमारे, बाबा रोडे, प्रमुख कार्यकर्ते होते. त्यांनी भरपूर मेहनत घेतली. एका कामगाराला स्वतंत्र भांडे आणण्यास अनाठायी खर्च होतो.


Click:-परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !


बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना मोफत भांडे वाटप आहे अशी जागृति निर्माण करावी तसेच सामाजीक कार्यकर्त्यांकडून लूट होणार नाही याचा प्रयत्न करावा. तसेच सुरक्षा संच व गृहउपयोगी संच किमान तालुक्याच्या ठिकाणी आणून द्यावेत ही बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार