#mbnews#>>महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना

 महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या  महामॅरेथॉन स्पर्धेत  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

        राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी शहर पोलीस स्टेशन समोरुन 'संत सेवालाल महाराज चौक' येथून सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 7:00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी-वै च्या वतीने शालेय गट,खुला गट,ज्येष्ठ नागरिक गट,महिला गट या चार गटात 'महामॅराथॉन स्पर्धा' आयोजित केली असून 'Green Parli...Clean Parli' हा निर्धार या 'महामॅराथॉन' स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 'महामॅराथॉन' स्पर्धेत प्रत्येक गटात आकर्षक पारितोषिक,मानचिन्ह प्राप्त होणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रविण्य प्रमाणपत्र आणि एक वृक्ष भेट दिले जाणार आहे.

    नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून 'हरीत परळी.. स्वच्छ परळीचा निर्धार करावा.या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा शिक्षक संघटनेचे अजय जोशी, एस पी मुंडे, विलास अरगडे, प्रा सुनील चव्हाण, संजय देशमुख, प्रा अतुल दुबे बाळासाहेब हांगरगे, विजय मुंडे, गणेश गुट्टे, मदन कराड, नारायण वानखेडे, प्रा जगदीश कावरे, यशवंत कांबळे दीपक कदम, श्री टेकाळे, चंदू चाटे ,ओम् मेनकुदळे, सय्यद अन्वर, परवेज देशमुख ,गणी सर, विजय बेंडसुरे , संजय शेप, भारत तांदळे, प्रा बाळू भातांगळे, जगन्नाथ गोपनपाळे,प्रा इतापे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार