23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात

 भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात 


 परळी (प्रतिनिधी):

                येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित एक संस्कारक्षम पिढी घडविणारी, पालकांच्या प्रथम पसंतीस उतरलेले, एकमेवाद्वितीय भेल संकुलामध्ये इ .स 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील सी.बी.एस.ई व स्टेट या शाखांमधील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत गुणगौरव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मा. डाॅ.श्री हेमंत वैद्य (सहकार्यवाह, भा. शि. प्र. सं अंबाजोगाई) आणि मा श्री. शरद राठोड साहेब (वेल्फेअर ऑफिसर) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. जीवनराव गडगूळ (सचिव ) यांनी भूषवले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री. राहुल सूर्यवंशी सर व सौ.सुमेधा कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या संघाने 'सरस्वती स्तवन' व 'सामूहिक पद्य' सादर करून केली. त्यानंतर संकुलामधील सी.बी.एस.ई व स्टेट विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावर्षी दोन्हीही शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य करत भेल संकुलाचा शंभर टक्के(100%) निकाल लावून भेलच्या शिरपेच्यात आणखीन एक नवीन मानाचा तुरा रोवला. त्याबरोबरच भेल संकुलातील विद्यार्थी अनेक *स्पर्धात्मक परीक्षेतही* आपले नाव काढत आहेत *ऑलिम्पियाड स्पर्धेत* वेगवेगळ्या विषयात विशेष प्राविण्य मिळविलेल्या एकूण 31 विद्यार्थ्यांचांही यावेळी मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देतांना आपल्या शाळेप्रती व शिक्षकांप्रती असलेल्या भावनांना उत्कट शब्दात वाट मोकळी करून दिली. ते म्हणतात की, भेल संस्कार केंद्राने जी चांगल्या संस्काराची  शिदोरी आम्हाला दिली आहे, तो आमच्यासाठी अनमोल ठेवा असून त्याचा वापर पावलोपावली आमच्या जीवनात होत आहे. काहींनी तर अनेक शिक्षकांची हुबेहूब नक्कल करत वातावरणात थोडेसे हास्याचे फवारे उडून वातावरण निर्मिती केली. याप्रसंगी कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी मा. डाॅ.श्री. हेमंतजी वैद्य सरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना भेल संकुलातील दोन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदीप्यमान यश हे खरोखरच संस्थेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, पुढे बोलतांना विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी पाळून मेहनत केली तर यश हे निश्चितच मिळते हे वेगवेगळे उदाहरण देऊन पटवून दिले आणि त्यांच्या पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शेवटी निश्चितच भेल संकुलातुन अनेक गुणवंत, यशवंत आणि किर्तीवंत विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मा. श्री.शरदजी राठोड सरांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या. 

  स्व. अजित विकासराव डुबे स्मृती समारोह सोहळा (निधी समर्पण सोहळा)

 यानंतर भेल संकुलाचे सर्वेसर्वा मा. श्री विकासराव डुबे (दादा) यांच्या मोठ्या मुलाचे म्हणजेच स्व. अजित विकासराव डुबे स्मृती समारोह प्रसंगी दादांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भेल संकुलातील सुसज्ज अशा ग्रंथालयास विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पुस्तके आवश्यक असतात म्हणून पुस्तकासाठी म्हणून 11001/- रुपयांचा धनादेश संकुलाचे प्राचार्य श्री. गिरीषजी ठाकूर सरांकडे सुपूर्द केला. यावेळी श्री. विष्णुपंत कुलकर्णी यांनी स्व. अजित डूबे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी डुबे कुटुंबातील सर्व सदस्यांनी साश्रू नयनांनी त्यांना आदरांजली वाहिली.

      या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना श्री.जीवनराव गडगूळ यांनी आपले मत मांडताना म्हणतात की, शिक्षकाचे महत्व सांगत 

                  गुणवंताचा गुणगौरव सोहळ्यानिमित्त त्यांच्या जडणघडणीत मोलाचे कार्य पार पाडणाऱ्या सर्व शिक्षकवृंदांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास प्रेरित केले. याप्रसंगी मा.  श्री. अमोल  डुबे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती) श्री. जीवनराव गडगूळ सर (सचिव) श्री. विष्णुपंत कुलकर्णी ,  सौ.शोभा भंडारी मॅडम ( सदस्य)संकुलाचे प्राचार्य श्री. गिरीशजी ठाकूर सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,कार्यक्रम प्रमुख व मोठ्या संख्येने पालक आणि शहरातील प्रतिष्ठित मंडळी व असंख्य विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गिरीशजी ठाकूर सर यांनी सूत्रसंचालन सौ.रोहिणी वाकडे मॅडम व श्री. कुंदन  दहिफळे सर तर  श्री.प्रमोद गौरशेटे सर यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सौ.पुनम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वीपणे आपापले कार्य  पार पाडले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती भेल संकुलाचे प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रफुल्ल कांबळे सरांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?