इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट

पंकजा मुंडेंना मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळावी-नरसिंग सिरसाट



मुंबई(प्रतिनिधी)

 भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर उमेदवारी जाहिर झाल्यानंतर केवळ बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील काना कोपर्‍यातल्या हितचिंतक तथा अठरापगड जातीधर्माच्या सामान्य लोकांना कमालीचा आनंद वाटला. मात्र विधान परिषद हे आमच्या नेतृत्वासाठी मिळालेली संधी आनंदाची गोष्ट असली तरी  यापेक्षा मोठं होवुन संपुर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करावं अशा प्रकारची भावना परळीतुन आलेले कडवे समर्थक नरसिंग सिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

       पंकजा मुंडे यांच्या वरळी स्थित निवासस्थानी तीन दिवसापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन भेटण्यास येणार्‍याच्या गर्दीत तुफान वाढ झाली.मागच्या पाच वर्षापासुन राजकिय प्रतिष्ठा मिळण्याची सामान्य लोक वाट पहात होते.पक्षानं विधान परिषद उमेदवारी पहिल्या क्रमांकात त्यांना दिली. कदाचित भविष्यात मोठी राजकिय जबाबदारी देखील त्यांच्यावर येवु शकते यात तिळमात्र शंका नाही. नरसिंग सिरसाट ज्यांना सावकार म्हणुन परळीत ओळखल्या जातं. पंकजाताईचे कडवे समर्थक असंही म्हणता येईल.नगर परिषद, बाजार समिती, अशा अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या. तळमळीचा कार्यकर्ता, निष्ठेचा भोक्ता यातुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. संघटन आणि मित्र कसे जोडावेत?ही राजकिय कला त्यांच्याकडे आहे. आमच्या प्रतिनिधीसोबत त्यांची कार्यालयात भेट झाली. ते म्हणाले, आज आमचं स्वप्न साकार होतंय याचा मनस्वी आनंद आम्हा होतच आहे पण एवढीच आम्हासारख्याची भुक नव्हे. कारण पंकजाताई हे नेतृत्व अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन चालतं. स्वाभिमानाचं राजकारण करताना मोठ्या साहेबांचा वारसा चालवताना उपेक्षित, वंचित, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेची सेवा त्यांनी केली. लोक कल्याणाची दिशा त्यांच्या नेतृत्वात आहे. प्रामाणिक नेतृत्व आणि पारदर्शी राजकारण यातुन आमच्यासारख्याला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. लोकसभेत झालेला पराभव नैतिकदृष्ट्या आमचा विजयच म्हणावा लागेल.ज्यांनी गद्दारी केली, असे चेहरे उघडकीस आले.


Click:-परळीतील गोळीबार प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल !


     पण असं असलं तरी विधान परिषदेच्या माध्यमातुन सन्मान वाढला.तो मनस्वी आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला झाला.मात्र यापेक्षा अधिक जबाबदारी त्यांच्यावर येण्याची गरज वाटते.कारण सामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांचे नेतृत्व उपयुक्त असुन यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्याकडे यावी असं देखील त्यांनी म्हटलं.आपण तीर्थक्षेत्र अक्कलकोट, गाणगापुर आणि पंढरपुर,शिर्डी आदी देवस्थानाला ताईसाहेबांसाठी नवस बोलले असुन इच्छा पुर्ण झाल्याने आम्ही श्रद्धाही पुर्ण करणार असल्याचे पंकजाताई समर्थक तथा सारांश निधी अर्बनचे चेअरमन  सांगितले नरसिंग सिरसाट यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!