एक लाख किलोमीटर सायकल चालवली .....!

 परभणी ते पंढरपूर सायकलवारीचे परळीत स्वागत


एक लाख किलोमीटर सायकल चालवणे पुर्ण केल्याबद्दल शंकर फुटके यांचा सत्कार


परळी वैजनाथ दि.०५ (प्रतिनिधी) 

          परभणी येथील १५ सायकलस्वारांनी परभणी ते पंढरपूर सायकल वारी काढली असून दोन दिवसात अंदाजे ३५० किलोमीटर अंतर कापणार आहेत. या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रमंडळीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

          परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांनी आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल चालवणे सुरू केले आहे. हळूहळू यामध्ये जवळपास २०० ते २५० जण ज्यात विविध क्षेत्रातील आरोग्याची काळजी घेणारे सहभागी झाले. यातून सायकल चालवण्याची आवड निर्माण झाली. सध्या हे सर्व सायकलस्वार रोज ५० ते ६० किलोमीटर सायकल चालवतात, यातूनच पंढरपूर वारीची संकल्पना सुचली. यामध्ये काही डॉक्टर व युवक सहभागी झाले. शुक्रवारी (ता.०५) पहाटे ५ वाजता परभणी येथून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास १२५ किलोमीटरवर कळंब येथे मुक्काम तर दुसरा मुक्काम थेट पंढरपूर मध्ये असणार आहे. तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथे सकाळी सायकलवर प्रभात फेरी, नगर प्रदक्षिणा, सायकल रिंगण सोहळा पूर्ण करून पांडुरंगाचे दर्शन व महाप्रसाद घेऊन रेल्वेने परतीचा प्रवास होईल. आतापर्यंत या सायकल स्वारांनी नांदेड, औरंगाबाद, जालना सायकल फेरी काढलेली आहे. या सायकल वारीचे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनैश्वर प्रतिष्ठान व मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या सायकल वारीमध्ये प्रभावती रायडर्सचे अध्यक्ष माणिक गरुड, उपाध्यक्ष दिपक  तळेकर, सचिव श्रीनिवास संगेवार, कोषाध्यक्ष राजेश्वर वासलवार, सहसचिव शंकर फुटके, सल्लागार सदस्य नीरज पारख, कल्याण देशमुख, गिरीश जोशी, संदिप पवार, प्रकाश बुजुर्गे, बालाजी तावरे,नितीन शेवलकर,ओमकार भेडसुरकर, सिद्धांत ओझा, महादेव मांडगे, दिनेश शर्मा आदी सायकलीश्ट सहभागी झाले आहेत. यांचे स्वागत अँड साखरे, शिवशंकर जठार,  शांतलिंग फुटके, शिवहार उदगीरकर, चंद्रशेखर फुटके, प्रा प्रविण फुटके सह शनैश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

-------------------------------------------------

  परळीतील शास्त्रीनगर भागाचे भूमिपुत्र (ह.मु परभणी) सायकलिस्ट शंकर फुटके यांनी नुकतेच सायकलिंगचा १ लक्ष किलो मीटरचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. असा पराक्रम करणारे ते पहिले सायकलिस्ट आहेत.

 शंकर नागनाथ फुटके यांनी नुकतीच १ लाख किलोमीटर सायकल चालवणे पुर्ण केले. यानिमित्त शंकर फुटके यांचा अँड साखरे व फुटके परिवाराच्या वतीने औक्षण करुन, शाल, पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले. यावेळी सुजाता फुटके, प्राची फुटके उपस्थित होत्या. 

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार