पोस्ट्स

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ

इमेज
  कृषी महोत्सव परळी : शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कृषी प्रदर्शनास सोमवार एक दिवसाची मुदतवाढ - धनंजय मुंडे यांचा निर्णय कृषी महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा आज चौथ्या दिवशीही राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांची कृषी व पशु प्रदर्शनास भेट, सर्वच स्टॉल्स वर दिवसभर प्रचंड गर्दी आजच्या तांत्रिक सत्रात ड्रोन द्वारे फवारणीची प्रात्यक्षिके, कीड रोग नियंत्रणावर सखोल मार्गदर्शन परळी वैद्यनाथ, दि. 24: परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवास राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून, या प्रदर्शनास आता एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. चौथ्या श्रावण सोमवारी देखील आता कृषी महोत्सव सुरू असणार असून, हा महोत्सव आता 5 ऐवजी 6 दिवसांचा करण्यात येत आहे.  राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावे, शासकीय योजनांची माहित्ती शेतक-यापर्यंत पोहोचावी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्या

तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन

इमेज
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मेश्राम परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         समाजाच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्या योजनाचा सामान्य माणसांना लाभ होणे अपेक्षित आहे त्यासाठी आमचे प्रयत्न असून या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मेश्राम मॅडम यांनी केले.         पंचायत समिती परळी वैजनाथ येथे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थी पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागासबहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती मेश्राम मॅडम उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण बारगजे  (निरीक्षण इतर मागास बहुजन कल्याण बीड), बालासाहेब नागरगोजे (गटविकास अधिकारी परळी वैजनाथ) , जीवन राठोड (अध्यक्ष लेंडेवाडी आश्रम शाळा), प्राचार्य उल्हास पवार (शिवाजीनगर आश्रम शाळा), जाधव सर (प्राचार्य कौडगाव आश्रम शाळा) हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थ

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे सोमवारी आयोजन

इमेज
  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे सोमवारी आयोजन परळी वैजनाथ/प्रतिनिधी  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.  परळी शहरातील पंचवटी नगर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक जवळ शांती भवन येथे सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दहीहंडी, राधाकृष्ण देखावा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बदलापूर घटना: परळीत महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून निषेध करत प्रशासनाला दिले निवेदन

इमेज
  बदलापूर घटना: परळीत महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून निषेध करत प्रशासनाला दिले निवेदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         बदलापूर येथील शालेय मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना व महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महाराष्ट्र बंद चे आवाहन केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा बंद मागे घेतलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले. त्याच अनुषंगाने परळी येथेही महाविकास आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.          महाविकास आघाडीकडून देण्यात आलेलिया निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,बदलापूर येथे शाळेतील ४ वर्ष व ६ वर्ष वयाचा विद्यार्थिनी वर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केलेला उघड झाला असून प्रकरण दडपण्या साठी शाळेतील संस्थेने व फिर्याद देण्या साठी जाणूनबुजून चालढकल केलेली असून संबंधित प्रत्येक घटकावर कडक कार्यवाही करून आरोपीला कडक शासन करावे व अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी ची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्रात महिलांवर व विद्यार्थिनी वर होत असलेल लैंगिक अत्याचार थांबवण्या साठी आरोपीना तत्काळ कडक श

संत भगवानबाबा जन्मोत्सव साजरा

इमेज
  संत भगवानबाबा जन्मोत्सव साजरा  पाटोदा /अमोल जोशी...             पाटोदा  शहरातील माऊलीनगर भागात श्री सुनील खाडे यांच्या निवासस्थानी असलेल्या संत  भगवान बाबा व संत वामनभाऊ मंदिरात श्री संत भगवान बाबा यांचा 128 वा जमोत्सव सोहळा शनिवारी  पहाटे सूर्योदयाला अभिषेक व जमोत्सवाचे पाळणे घेऊन  साजरा करण्यात आला व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला सुनील खाडे यांनी सपत्नीक अभिषेक केला या जन्मोत्सव सोहळ्यास पाटोदा शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान बाबांच्या दर्शनासाठी  दिवसभर भाविक येत आहेत.

तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना रेशीम शेतीवरील विस्तृत मार्गदर्शन व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा

इमेज
  परळी वैद्यनाथ कृषी महोत्सव : तिसऱ्या दिवशीही राज्यभरातील शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद तांत्रिक सत्रात शेतकऱ्यांना रेशीम शेतीवरील विस्तृत मार्गदर्शन व यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा दर महिन्याला नोकरदाराप्रमाणे पैसा देणारी रेशीम शेती; शेतकऱ्यांनी नक्की प्रयोग करावा - महेंद्र ढवळे, उपसंचालक रेशीम, नागपूर परळी वैद्यनाथ (दि. 23) - परळी वैद्यनाथ येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज देखील राज्यभरातून शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी याठिकाणी भेट देऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत. गडचिरोली, अमरावती, नागपूर, रत्नागिरी, रायगड ते अगदी कोल्हापूर पासून या प्रदर्शनास शेतकरी बांधवानी उदंड प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.  कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या विविध कृषी उत्पादने व उमेद अभियानातील महिला बचत गटांच्या स्टॉल्स वर खरेदीसाठी पुरुषांसह महिलांची देखील मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.  तांत्रिक सत्रात रेशीम शेतीवर मार्गदर्शन बदलत्या व असंतुलीत हवामानात शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने रेशीम शेती हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. तुती,

काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून होणार निषेध

इमेज
  बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीचा परळी बंद मागे-बहादुरभाई,ॲड.जीवनराव देशमुख   काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून होणार निषेध परळी प्रतिनिधी बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्र बंदच्या समर्थनात परळी बंदची हाक देण्यात आली होती.राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही,असा निर्णय दिला असल्याने उच्च न्यायालयाचा सन्मान करत आजचा परळी बंदचा निर्णय परळी महाविकास आघाडीने माघे घेतला आहे.असे परळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुरभाई, रा.काॅ. शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस

25 ऑगस्ट रोजी परळीत मराठवाड्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव: सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा - सुनील गुट्टे

इमेज
25 ऑगस्ट रोजी परळीत मराठवाड्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव: सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा - सुनील गुट्टे परळी ,प्रतिनिधी.            येत्या 25 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक उद्योजक सुनील गुट्टे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.     याबाबत पत्रकारांशी बोलताना सुनील गुट्टे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे  यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील हालगे गार्डन, वैद्यनाथ मंदिराच्या बाजूस या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी सकाळी  9 ते सायंकाळी 6  यादरम्यान या नोकरी महोत्सवाचे आयोजन होत आहे.या नोकरी महोत्सवात 50 कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. कमीत कमी पाचवी पास ते पदवीधर ,आयटीआय, डिप्लोमा आणि अंतिम वर्षे पदवी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.     याबरोबरच आयटी ,बँकिंग, किरकोळ क्षेत्र, बीपीओ, फार्मसी, हॉटे ल, विमा, साखर उद्योग, बिसलेरी, ऊर्जा, दूरसंचार विभाग, सुरक्षा सुविधा, इ कॉम

ड्रोनमुळे नागरिकांत भिती ; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी

इमेज
  अज्ञात ड्रोनच्या घिरटयांचा पोलीस प्रशासनाने तातडीने शोध घ्यावा  आ. पंकजाताई मुंडे यांनी उप मुख्यमंत्र्यांसह एसपींकडे केली पत्राद्वारे मागणी ड्रोनमुळे नागरिकांत भिती ; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी बीड।दिनांक २३। गेल्या काही दिवसांपासून  अहमदनगर व बीड जिल्ह्यात ड्रोनच्या घिरट्याने ग्रामीण भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    चोरीच्या भीतीने नागरिक रात्र जागून काढत आहेत. हा प्रकार नेमका काय आहे? याचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाला संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही जिल्ह्याच्या एसपींकडे एका पत्राद्वारे केली आहे.    मागील एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, गेवराई, वडवणी, धारूर यासह अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोन च्या माध्यमातून चोरीसाठीची रेकी करत असल्याची अफवा नागरिकांमध्ये आहे, त्यामूळे नागरिकांची झोप उडाली असून ग्रामस्थांमध्ये

मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिण योजनेबाबत भगिनींना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी:- अनिल बोर्डे

इमेज
  मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिण योजनेबाबत भगिनींना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी - अनिल बोर्डे           गेवराई :- मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनी गेवराई येथील बँकेत व पोस्ट कार्यालयात जातात त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती बीड जिल्ह्यातील नामांकित दैनिक दिव्य लोकप्रभा च्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे त्याची दखल बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी त्याची दखल घेऊन होणाऱ्या त्रासाची माहिती माननीय पोस्ट मास्टर,  मुख्य व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गेवराई येथील दोन्ही शाखेस देऊन त्यांना या त्रासाची माहिती प्रत्यक्ष देऊन काउंटर वाढविण्याची मागणी केलेली आहे काउंटर वाढविण्याची मागणी मान्य केलेली आहे त्याची प्रत तहसीलदार गेवराई यांना दिलेली आहे.                   मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभ घेण्यासाठी महिला भगिनी गेवराई येथील आपल्या शाखेत केवायसी आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी येत आहेत परंतु सदरील भगिनींना आपल्या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे भगिनींना काउंटरवर अन्न पाण्य

आंध्रप्रदेशच्या 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल

इमेज
पाठलाग करत गाढव चोरून नेणारी टोळी पोलिसांनी पकडली आंध्रप्रदेशच्या 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल माजलगाव दि.२३(प्रतिनिधी) शहरातून आयशर टेम्पो मध्ये गाढव चोरून नेणारी टोळी माजलगाव शहर पोलिसांनी पकडली.ही कार्यवाही शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान  धारूर रोड एलआयसी ऑफिस समोरुन पाठलाग करत चाठबोरगाव (सेलू) येथे करण्यात आली.दरम्यान आंध्र प्रदेशच्या 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की,शुक्रवारी मध्यरात्री सुरू असलेल्या गस्ती पथकाला खबऱ्या मार्फत माहिती समजली की,भुरकट रंगाचा आयशर टेम्पो(ए.पी.टी.7503) यामध्ये गाढव चोरून नेल्या जात आहेत.यावरून पोलिसांनी सापळा रचला.धारूर रोड एलआयसी ऑफिस समोर टेम्पो आला.परंतु टेम्पो चालकाने पोलिसांना पाहताच टेम्पो वेगाने पळवला.दरम्यान पोलीस वाहन चालक गायकवाड यांनीही त्याच गतीने टेम्पोचा पाठलाग करत गाढव चोरून नेणारा टेम्पो परभणी जिल्ह्यातील चाठबोरगाव (सेलू) येथे पकडला. बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना टेम्पोमध्ये 14 गाढवे दिसून आली. सुदृढ एका गाढवाची किंमत दहा हजार तर कृश असणाऱ्या एका गाढवाची किंमत आठ हजार आहे. एकूण पकडलेल्या 14 गाढव

सर्व व्यापारी बांधव, नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे-बहादुरभाई

इमेज
  बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद समर्थनार्थ शनिवारी परळी बंद  सर्व व्यापारी बांधव, नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे-बहादुरभाई परळी, प्रतिनिधी....     बदलापुरात दोन चीमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी परळी शहर काँग्रेस वतीने शहर काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असुन शनिवार दि.24 आँगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह महाविकास आघाडीने दिली आहे या महाराष्ट्र बंदच्या हाकेला परळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी साथ देत परळी बंद पुकारला आहे तरी परळी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे असे नम्र आवाहन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या आदेशावरून आज परळी शहर काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीत बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. याबैठकीत सविस्तर चर्चा

लाच घेताना परळीत दोघांना रंगेहात पकडले

इमेज
  लाच घेताना परळीत दोघांना रंगेहात पकडले   परळी वैजनाथ प्रतिनिधी     संस्थेच्या लेखापरीक्षणाची फीस कमी करण्यासाठी लाच घेणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने परळीमध्ये रंगेहात अटक केली आहे. बीड जिल्ह्यात घडत असलेल्या लाचेच्या घटनेने खळबळ उडाली आहे.       याबाबत अधिक माहिती अशी की वानटाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2008 ते सन 2021 या वर्षाचे लेखा परीक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी लागणारे शुल्क कमी करण्यासाठी सेवा सहकारी संस्था वानटाकळीचे सचिव बाबासाहेब धोंडीराम सिगे वय 56 राहणार परळी वैजनाथ व सेवा सहकारी संस्था सारडगावचे सचिव अंकुश पवार राहणार तालखेड तालुका माजलगाव या दोघांनी 1 लाख 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पर्यवेक्षण अधिकारी सिद्धराम मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार आशिष पाटील, सिद्धेश्वर तावस्कर, सचिन शेवाळे, दत्तात्रेय करडे यांनी सापळा लावला. दिनांक 22. 8. 2024 रोजी 1 लाख 25 हजार रुपयाची लाच स्वीकारताना दोघांनाही पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.      याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ग

परळीत साठ हजाराचे गोवंश पकडले

इमेज
  परळीत साठ हजाराचे गोवंश पकडले परळी (प्रतिनिधी)  कत्तलीसाठी जात घेवुन जात असलेले 60 हजार रुपये किंमतीचे सहा बैल परळी शहर पोलिसांनी पकडुन एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेजसमोर गुरुवार दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता मालवाहु टेम्पो क्र.एम.एच.14 ई एम मधुन दोन मोठे बैल व चार गोर्हे दाटीवाटीत कोंबुन वाहतुक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता सदरील गोवंश आढळुन आले.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात वाजेद मंजुर कुरेशी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गुट्टे हे करत आहेत.

बीड एसीबीची कारवाई

इमेज
एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी पकडला!  मुरुमाचे उत्खनन कमी दाखवण्यासाठी स्विकारली लाच, बीड एसीबीची कारवाई    बीड, : अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात झालेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकार्‍याने दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली, तडजोडअंती दीड लाख ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्विकारताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.21) दुपारी मंडळ अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले. बीड एसीबीने केलेल्या या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.   सचिन भागवत सानप (वय 39, रा.एमएसजी अपार्टमेंट, जुनानगर नाका, बीड) असे बीड शहरच्या लाचखोर मंडळ अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदाराच्या नातेवाईकांसह इतरांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात अवैध मुरुम उत्खनन संदर्भात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्या संदर्भात मंडळ अधिकारी सानप याने बीड तरफ खोड सज्जा अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक 49 मधील मुरुम उत्खनन जागेचा पंचनामा केला होता. नमुद पंचनाम्यात एक हजार ब्रास ऐवजी 500 ब्रास उत्खनन दाखवून तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी सानपन

वेदांच्या विशुद्ध ज्ञानानेच जगात मानवता व शांतता नांदेल- वेदप्रचार सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात श्री ज्ञानप्रकाशजी शास्त्री

इमेज
वेदांच्या विशुद्ध ज्ञानानेच जगात मानवता व शांतता नांदेल- वेदप्रचार सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात श्री ज्ञानप्रकाशजी शास्त्री     परळी वैजनाथ, दि.२१--              आज सारे जग दुःख आणि अशांततेच्या सावटाखाली आहे. मानवनिर्मित मत -संप्रदायाच्या वाढत्या प्रभावामुळे वाईट प्रवृत्ती बळावत असून माणूस हा एक दुसऱ्याचा शत्रू बनत चालला आहे. अशा संक्रमणाच्या युगात स्वामी दयानंदांनी पुनर्मांडणी केलेल्या वेदांच्या विशुद्ध तत्त्वज्ञानानेच संपूर्ण जगात मानवतेची स्थापना होऊन सर्वत्र शांतता व सुरक्षितता नांदू शकेल, असे प्रतिपादन उच्च कोटीचे वैदिक विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाशजी  शास्त्री यांनी केले.                  येथील आर्य समाजात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या श्रावणी वेद प्रचार सप्ताहाची  नुकतीच सांगता झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते. तर श्री स्वामी सोमानंदजी सरस्वती व श्री वैजनाथराव चिल्ले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री शास्त्री यांनी वेदांचे महत्त्व प्रतिपादन करून आज मोठ्या प्रमाणात व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व विश्वस्तरावर व

शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक बाबी उपलब्ध, शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा - धनंजय मुंडे

इमेज
  राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून पाहणी साडेतीन तास कृषीमंत्री रमले स्टॉल्स पाहण्यात, 335 स्टॉल्सला दिल्या भेटी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक बाबी उपलब्ध, शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा - धनंजय मुंडे परळी वैद्यनाथ (दि.22) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रथमच परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव अंतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर भेट देऊन पाहणी केली.  कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन आधुनिक अवजारे यांसह विविध शेती उत्पादने आदींची शेकडो दालने (स्टॉल्स) उभारण्यात आली असून नॅनो खतांची ड्रोन द्वारे फवारणी करण्याची प्रात्यक्षिके सुद्धा येथे दाखवण्यात येत आहेत. या स्टॉल्सला भेटी देण्यामध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे हे तब्बल साडेतीन तास रमले होते. जवळपास 7.30 ते 11 वाजेपर्यंत या वेळेत त्यांनी जवळपास 335 स्टॉल्सला भेटी देऊन पाहणी केली व त्यांच्याकडील उत्पादनांची व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. चारही कृषी विद्यापीठाचे स्टॉल

गोकुळ आष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

इमेज
  गोकुळ आष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       श्रीकृष्ण मंदिर हनुमान नगर, डोंगरतुकाई रोड, परळी वैजनाथ येथे गोकुळ आष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा व हरिपाठ व दैनंदिन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गवळी समाज परळी वैजनाथ यांनी केले आहे.         बुधवार दि.२१/०८/२०२४ पासुन या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असुन मंगळवार दि.२७/०८/२०२४ रोजी सांगता होणार आहे.ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ: ह.भ.प.लक्ष्मीताई नारायणराव गायकवाड तर भागवत कथा प्रवक्त्या भागवताचार्य ह.भ.प.चंदाताई लोखंडे,संगीत साथ :- राजेभाऊ महाराज मुंडे, तबला साथ :- श्री. महारुद्र महाराज, राजेभाऊ म. आंधळे, हरिपाठ नेतृत्व :- वै.ह.भ.प. ज्ञानोबामाऊली लटपटे वारकरी शिक्षण संस्था (चंद्रभागा आश्रम परळी वै.) हे असणार आहेत.या सप्ताहात ६ ते ७ विष्णूसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, २ ते ५ भागवत कथा, दु. ५ ते ७ हरिपाठ असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.तसेच वीरशैव शिवकन्या म

कायदा कडक करा

इमेज
'  तिला' न्याय द्या; परळीत डॉक्टरांचा भव्य मूक मोर्चा दिवसेंदिवस डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवा; कायदा कडक करा परळी,( प्रतिनिधी):- आर.जे. कार वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परळीतून डॉक्टर व सर्व स्तरातील नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढून दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात परळीतील सर्व सामाजिक स्तरातील माता-भगिनीसह अनेकांची मोठी उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मूक मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. काळ्या फिती लावून पश्चिम बंगाल येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत हा मूक मोर्चा अण्णाभाऊ साठे चौक, एक मिनार चौक, मोंढा मार्केट राणी लक्ष्मीबाई टावर, येथून परळी शहर पोलीस ठाणे येथे आला. तेथे आल्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात मागणी विषयी निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कोलकत्ता येथील आर. जे. कार वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काढलेल्या मोर्चावर गुंड

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळीत मॉर्निंग वॉक करत 'निर्भय बनो' चा संदेश

इमेज
  डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळीत  मॉर्निंग वॉक करत 'निर्भय बनो' चा संदेश  परळी प्रतिनिधी -  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त परळी शाखेच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी परळीत निर्भयपणे अभियान अंतर्गत मॉर्निंग वॉक करण्यात आले तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यात आले.  ‌‌      डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा खरा सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाही. तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय बनो अभियान अंतर्गत सकाळी मॉर्निंग वॉक करून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने परळी शहरातील जिजामाता उद्यानात परळी शाखेच्या वतीने सकाळी सात वाजता मॉर्निंग वॉक करण्यात आले.          यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य हितचिंतक यांनी मॉर्निंग वॉक करताना डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमा हातात घेतल्या होत्या.  डॉ.नरेंद्र दाभोळकर अमर रहे, फुले शाहू आं

लाडक्या बहिणीपाठोपाठ आता शेतकरीही ठरणार लाडका!

इमेज
  कृषी महोत्सवातून राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता-धनंजय मुंडे कापूस-सोयाबीन अनुदान वितरण पोर्टलचेही होणार अनावरण लाडक्या बहिणीपाठोपाठ आता शेतकरीही ठरणार लाडका! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आज होणार उद्घाटन दुपारी बारा वाजल्यापासून भव्य मिरवणुकीचे आयोजन, एक वाजता होणार उद्घाटन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राज्यभरातून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन कृषी प्रदर्शनाच्या सभामंडपाला शेतकरी नेते स्व.पंडितअण्णा मुंडे यांचे नाव स्वागतासाठी परळी वैद्यनाथ नगरी सज्ज! परळी वैद्यनाथ (दि. 20) - परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री, केंद्

सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे- बालासाहेब जगतकर

इमेज
  सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी  बंदमध्ये सहभागी व्हावे- बालासाहेब जगतकर                                             परळी प्रतिनिधी:-- सर्वोच्च न्यायालयाच्या वर्गीकरणाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.                  याबाबत सविस्तर माहिती अशी की अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा आणि क्रिमीलेयर लावण्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आज भारत बंद पुकारण्यात आला असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या बंदला जाहीर पाठिंबा दिला असून या बंदमध्ये परळी शहर व तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक यांनी सहभागी व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक व तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळा

वैद्यनाथ कॉलेजमध्ये कराटे, योगासन आणि कुस्ती तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये कराटे, योगासन आणि कुस्ती तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन परळी वैजनाथ--दि.२० ऑगस्ट  रोजी वैद्यनाथ कॉलेजमध्ये कराटे, योगासन आणि कुस्ती यांसारख्या क्रीडा प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य, डॉ. अर्चना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री सुभाष नाणेकर सर,विद्या परिषद सदस्य व जवाहर शिक्षण संस्थेचे प्राध्यापक प्रतिनिधी तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉ.पी एल कराड , श्री अजय जोशी अध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघटना, श्री एस पी मुंडे अध्यक्ष क्रीडा शिक्षक संघटना,श्री संजय पापा देशमुख क्रीडा  समन्वयक, श्री कांबळे सर,श्री शेप सर, गोपणपाळे सर, श्री शिवशंकर कराड ज्येष्ठ कुस्तीपटू, श्री गडदे सर,नितीन मुंडे, बेंबडे सर, भातांगळे, श्री कावरे सर,   फड सर, आरगडे सर,श्री विजय मुंडे ,यांनी पंच म्हणून काम पाहिले.तसेच उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयाच्या क्रीडाशिक्षकांसह विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्र.प्राचार्य चव्हाण  यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शारीरिक स्वास्थ्यासा

भेल संस्कार केंद्रातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

इमेज
  भेल संस्कार केंद्रातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड  परळी वै ता. 20....                        येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भेल संकुलातील एकूण तीन विद्यार्थ्यांची संभाजीनगर येथे होणाऱ्या *विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी* निवड झालेली आहे. या निवड झालेल्या खेळाडूंना भेल संकुलाचे क्रीडा प्रमुख श्री. यशवंत कांबळे सर, श्री. लक्ष्मण राडकर सर, डॉ. जगदीश कावरे सर आणि श्री. राजेभाऊ गडदे सर इ. सोबत इतर अनेक श्रेष्ठ, ज्येष्ठ, कनिष्ठ शिक्षक वृंदांचे उच्च कोटीचे मार्गदर्शन लाभले.            यामध्ये भेल संकुलातील विद्यार्थिनी *कु. अदिती अमोल कुलकर्णी हिने 17 वर्ष (मुली) या गटातून या स्पर्धेत बाजी मारत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे, तर मुलांमध्ये *चि. गुट्टे शिवम परमेश्वर* 14 वर्षे (मुले) आणि *चि. दिग्विजय शंकर महाजन* 17 वर्षे (मुले) या दोघांचीही निवड झालेली आहे. या निवड झालेल्या सर्व विजेत्या मुला- मुलींचे श्री. जुगलकिशोर लोहिया (अध्यक्ष,स्थानिक समन्वय समिती), श्री. जीवनराव गडगूळ (कार्यवाह) श्री. अमोल

जागतिक छायाचित्रकार दिवस परळीकरांनी केला उत्साहात साजरा

इमेज
  स्वतःच्या भावना लेन्समागे लपवत 'स्माईल प्लिज' म्हणत इतरांच्या आयुष्यातील आनंदी क्षण कायम ठेवतो  : फोटोग्राफर असोसिएशन जागतिक छायाचित्रकार दिवस परळीकरांनी केला उत्साहात साजरा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे आपल्या आयुष्यातील सुख दुःख सामावून घेणारे फोटोज. ते फोटो काढणारे परळी वैजनाथ येथील छायाचित्रकार यांचा सत्कार करून परळीकरांनी जागतिक छायाचित्रकार दिवस पद्मावतीमधील गड्डे का अड्डा येथे उत्साहात साजरा केला. परळीची प्रतिमा सदा सर्वकाळ धार्मिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक आदी क्षेत्रांत अधिकाधिक उजळण्यासाठी येथील फोटोग्राफर सदैव प्रयत्नरत असतात. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात आमच्या नकळत आमचे फोटो काढून आम्हांला पाठवणारे छायाचित्रकार बांधव आम्हांला सुखद धक्का देतात अशा भावना याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, श्रीकांत पाथरकर, शंकर कापसे, माणिकभाऊ मित्रमंडळ आदींनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम गोंडे यांनी केले. यावेळी फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने सुनील फुलारी यांनी स्वतःच्या भावना लेन्समागे लपवत 'स्माईल प्लि