तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा - इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मेश्राम
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
समाजाच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्या योजनाचा सामान्य माणसांना लाभ होणे अपेक्षित आहे त्यासाठी आमचे प्रयत्न असून या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक मेश्राम मॅडम यांनी केले.
पंचायत समिती परळी वैजनाथ येथे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थी पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागासबहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती मेश्राम मॅडम उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण बारगजे (निरीक्षण इतर मागास बहुजन कल्याण बीड), बालासाहेब नागरगोजे (गटविकास अधिकारी परळी वैजनाथ) , जीवन राठोड (अध्यक्ष लेंडेवाडी आश्रम शाळा), प्राचार्य उल्हास पवार (शिवाजीनगर आश्रम शाळा), जाधव सर (प्राचार्य कौडगाव आश्रम शाळा) हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बारगजे सर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थी पर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे प्रस्ताविकांमध्ये बारगजे म्हणाले. महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती प्रशिक्षण अर्थसाह्य योजना, इतर मागासवर्गीय महामंडळामार्फत विविध कर्ज योजना तसेच शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक महामंडळ, संत सेनाजी महाराज केसशिल्पी आर्थिक विकास मंडळ, यासह ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी आश्रम शाळा, विजाभज मुला मुलींसाठी आश्रम शाळा, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घेण्याची संधी,मोदी आवास योजना व तांडासुधार, वस्ती योजना आदी योजनेची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालासाहेब नागरगोजे यांनीही इतर मागास बहुजन कल्याणच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गाव पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ते व आश्रम शाळेतील शिक्षकांना शासन व लाभार्थी यांच्यामध्ये दुवा बनून काम करण्याचे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती मेश्राम यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली.सर्व योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचण्याचे सर्वांना आवाहन केले .
या कार्यक्रमाला परळी तालुक्यातील ग्रामसेवक सरपंच व आश्रम शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक व्ही. ए.चव्हाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी.टी .पवार सर यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा