जागतिक छायाचित्रकार दिवस परळीकरांनी केला उत्साहात साजरा
स्वतःच्या भावना लेन्समागे लपवत 'स्माईल प्लिज' म्हणत इतरांच्या आयुष्यातील आनंदी क्षण कायम ठेवतो : फोटोग्राफर असोसिएशन
जागतिक छायाचित्रकार दिवस परळीकरांनी केला उत्साहात साजरा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणजे आपल्या आयुष्यातील सुख दुःख सामावून घेणारे फोटोज. ते फोटो काढणारे परळी वैजनाथ येथील छायाचित्रकार यांचा सत्कार करून परळीकरांनी जागतिक छायाचित्रकार दिवस पद्मावतीमधील गड्डे का अड्डा येथे उत्साहात साजरा केला.
परळीची प्रतिमा सदा सर्वकाळ धार्मिक, औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक आदी क्षेत्रांत अधिकाधिक उजळण्यासाठी येथील फोटोग्राफर सदैव प्रयत्नरत असतात. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात आमच्या नकळत आमचे फोटो काढून आम्हांला पाठवणारे छायाचित्रकार बांधव आम्हांला सुखद धक्का देतात अशा भावना याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, श्रीकांत पाथरकर, शंकर कापसे, माणिकभाऊ मित्रमंडळ आदींनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम गोंडे यांनी केले.
यावेळी फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने सुनील फुलारी यांनी स्वतःच्या भावना लेन्समागे लपवत 'स्माईल प्लिज' म्हणत इतरांच्या आयुष्यात आनंद यावा व क्षण कायम राहावा, टिकवाअसे प्रयत्न छायाचित्रकार करतात,असे सांगत फोटोग्राफी क्षेत्राचा इतिहास, त्यातील बदल व आव्हाने त्यांनी आभारपर मनोगत व्यक्त केले.
वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये १८३७ मध्ये झाली. फ्रान्सचे जोसेफ निसेफोर आणि लुई डग्युरे यांनी त्यावर्षी १९ ऑगस्ट रोजी याची सुरुवात केली. त्यानंतर तेथील सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो.
आजच्या युगात फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी एकापेक्षा एक अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. याशिवाय फोटो काढण्यासाठी आता प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे आज फोटो काढणे ही गोष्ट खूप सोपी झाली. मात्र, पूर्वी फोटो काढणे खूप कठीण काम होतं. १८३९ मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियसने आपल्या वडिलांच्या दुकानाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा लावला होता. त्यानंतर दुकानाचा फोटो त्यांनी क्लिक केला आणि ३ मिनिटांनी एक फोटो बाहेर आला. त्यानंतर हळूहळू फोटो काढण्याची सुरुवात होऊ लागली अशी माहिती विविध फोटोग्राफर मंडळींनी दिली.
यावेळी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मोदानी, उपाध्यक्ष बाजीराव राठोड, सचिव मोहन तिडके, ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील फुलारी (नाना,) हरिभाऊ मोदानी, यशवंत चव्हाण, विठ्ठल झिलेमेवाड, सोमनाथ वळसे, राजू चव्हाण, दिनेश घोडके, हनुमान आगरकर, जयराम गोंडे, राम भाले, सुधीर मोदानी, संजय शिंदे, सोमनाथ सोनटक्के, अजित गोरशेट्टे, राजाराम तोरडमल, संदीप मोदानी, संदीप विभुते, अनिल उदगीरकर, महेश चव्हाण आकाश गित्ते, बाळू झिलेमेवाड आदी छायाचित्रकार बांधवांचा सत्कार करण्यासाठी प्रा. माणिकभाऊ मुंडे, प्रा. अशोकराव देशमुख, प्रा. अनंत देशमुख, प्रा. अमरचंद लोढा, प्रा. विठ्ठलराव सोळंके, प्रा.जी.टी. महाजन सर, निवृत्त पोलीस अधिकारी बलभीम रेपे, फुलचंद गित्ते, अनंत इंगळे, श्रीकांत पाथरकर, प्रा. शंकर कापसे, अनिरुद्ध जोशी, वैजनाथ सरकटे सर, बालाजी सातपुते, राजकुमार हजारे, उमाकांत गड्डे, रामभाऊ व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा