परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

वैद्यनाथ कॉलेजमध्ये कराटे, योगासन आणि कुस्ती तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये कराटे, योगासन आणि कुस्ती तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन




परळी वैजनाथ--दि.२० ऑगस्ट  रोजी वैद्यनाथ कॉलेजमध्ये कराटे, योगासन आणि कुस्ती यांसारख्या क्रीडा प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य, डॉ. अर्चना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री सुभाष नाणेकर सर,विद्या परिषद सदस्य व जवाहर शिक्षण संस्थेचे प्राध्यापक प्रतिनिधी तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉ.पी एल कराड , श्री अजय जोशी अध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघटना, श्री एस पी मुंडे अध्यक्ष क्रीडा शिक्षक संघटना,श्री संजय पापा देशमुख क्रीडा  समन्वयक, श्री कांबळे सर,श्री शेप सर, गोपणपाळे सर, श्री शिवशंकर कराड ज्येष्ठ कुस्तीपटू, श्री गडदे सर,नितीन मुंडे, बेंबडे सर, भातांगळे, श्री कावरे सर,   फड सर, आरगडे सर,श्री विजय मुंडे ,यांनी पंच म्हणून काम पाहिले.तसेच उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयाच्या क्रीडाशिक्षकांसह विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्र.प्राचार्य चव्हाण  यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शारीरिक स्वास्थ्यासाठी क्रीडेत सक्रिय सहभाग घेण्याचे महत्व अधोरेखित केले.स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहेत. कराटे, योगासन, आणि कुस्ती या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीवर भर दिला जाणार आहे. विजेत्यांनामहाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा समितीच्या वतीने करण्यात आले असून, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात आपला पुढाकार कायम ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. वैद्यनाथ कॉलेजची कु. पूनम गोविंद गित्ते ज्युदो या स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम आल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अजय जोशी यांनी केले तर अध्यक्षीय समारोप क्रीडा स्पर्धेचे आयोजक, वैद्यनाथ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अर्चना चव्हाण यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आरगडे सर तर आभार श्री संजय देशमुख यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!