गोकुळ आष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
गोकुळ आष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
श्रीकृष्ण मंदिर हनुमान नगर, डोंगरतुकाई रोड, परळी वैजनाथ येथे गोकुळ आष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा व हरिपाठ व दैनंदिन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गवळी समाज परळी वैजनाथ यांनी केले आहे.
बुधवार दि.२१/०८/२०२४ पासुन या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असुन मंगळवार दि.२७/०८/२०२४ रोजी सांगता होणार आहे.ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ: ह.भ.प.लक्ष्मीताई नारायणराव गायकवाड तर भागवत कथा प्रवक्त्या भागवताचार्य ह.भ.प.चंदाताई लोखंडे,संगीत साथ :- राजेभाऊ महाराज मुंडे, तबला साथ :- श्री. महारुद्र महाराज, राजेभाऊ म. आंधळे, हरिपाठ नेतृत्व :- वै.ह.भ.प. ज्ञानोबामाऊली लटपटे वारकरी शिक्षण संस्था (चंद्रभागा आश्रम परळी वै.) हे असणार आहेत.या सप्ताहात ६ ते ७ विष्णूसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, २ ते ५ भागवत कथा, दु. ५ ते ७ हरिपाठ असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.तसेच वीरशैव शिवकन्या महिला भजनी मंडळ,कालिका देवी महिला भजनी मंडळ,वडसावित्री महिला भजनी मंडळ,कृष्णनगर महिला भजनी मंडळ, द्वारकाधिश महिला भजनी मंडळ, सावतामाळी महिला भजनी मंडळ सहभागी होणार आहेत.सोमवार दि. २६/०८/२०२४ दांडिया ८ ते १०, दिपोत्सव १० वा. कृष्ण कन्हैय्याचा जन्मोत्सव रात्री १२ वा. होणार आहे. या सप्ताहात कृष्णनगर, चांदापुर, मलकापूर, भोपला,मालेवाडी यांचा हरिजागर होणार आहे. दि.२७/०८/ २०२४ ह.भ.प.श्री. गणेश महाराज जाधव परतुरकर यांचे सकाळी १२ ते २ काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल. या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक,संयोजक / मार्गदर्शक ह.भ.प. बळीराम महाराज भास्कर कृष्णनगर व समस्त गवळी समाज परळी वैजनाथ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा