इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिण योजनेबाबत भगिनींना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी:- अनिल बोर्डे

 मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहिण योजनेबाबत भगिनींना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी - अनिल बोर्डे    


  

   गेवराई :- मुख्यमंत्र्याच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनी गेवराई येथील बँकेत व पोस्ट कार्यालयात जातात त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती बीड जिल्ह्यातील नामांकित दैनिक दिव्य लोकप्रभा च्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे त्याची दखल बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी त्याची दखल घेऊन होणाऱ्या त्रासाची माहिती माननीय पोस्ट मास्टर,  मुख्य व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गेवराई येथील दोन्ही शाखेस देऊन त्यांना या त्रासाची माहिती प्रत्यक्ष देऊन काउंटर वाढविण्याची मागणी केलेली आहे काउंटर वाढविण्याची मागणी मान्य केलेली आहे त्याची प्रत तहसीलदार गेवराई यांना दिलेली आहे.               

   मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लाभ घेण्यासाठी महिला भगिनी गेवराई येथील आपल्या शाखेत केवायसी आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी येत आहेत परंतु सदरील भगिनींना आपल्या बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे भगिनींना काउंटरवर अन्न पाण्याविना दिवसभर थांबावे लागत आहे. त्यासाठी आपल्या बँकेने लाडक्या बहिणीचे हाल थांबविण्यासाठी जादा काउंटर उघडणे आवश्यक आहे याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.        

  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलाच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत. परंतु बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असल्याशिवाय आणि बँकेची केवायसी पूर्ण असल्याशिवाय पैसे जमा होत नाहीत. सकाळी बँकेत नऊ वाजल्यापासून भगिनींना आधार लिंक व केवायसी करण्यासाठी एकच काउंटर असल्यामुळे दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीचे हाल होत आहेत. तसेच काही महिलांना उद्धटपणाची वागणूक दिल्याचे कळते. अशा मुजोर कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड शाखेकडून करण्यात आलेली आहे.                         तरी वरील प्रकरणी योग्य ती कार्यवाही मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थ्यांना त्रास होणार नाही याबाबत कटाक्षाने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे. गेवराई नगरपरिषद माजी उपाध्यक्ष विश्वास चपळवाकर, नगरपरिषद माजी सदस्य राजेंद्र सुतार, प्राध्यापक भानुदास फलके, वल्लभ  तौर आदींनी केलेली आहे. या याप्रकरणी काही तक्रार असल्यास महिला भगिनींनी ग्राहक मार्गदर्शन केंद्र गेवराई यांच्याकडे भ्रमणध्वरीद्वारे तक्रार करावी त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल. भ्रमणध्वनी क्रमांक 94 21 34 30 60.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या