भेल संस्कार केंद्रातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
भेल संस्कार केंद्रातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
परळी वै ता. 20....
येथील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भेल संकुलातील एकूण तीन विद्यार्थ्यांची संभाजीनगर येथे होणाऱ्या *विभाग स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी* निवड झालेली आहे. या निवड झालेल्या खेळाडूंना भेल संकुलाचे क्रीडा प्रमुख श्री. यशवंत कांबळे सर, श्री. लक्ष्मण राडकर सर, डॉ. जगदीश कावरे सर आणि श्री. राजेभाऊ गडदे सर इ. सोबत इतर अनेक श्रेष्ठ, ज्येष्ठ, कनिष्ठ शिक्षक वृंदांचे उच्च कोटीचे मार्गदर्शन लाभले.
यामध्ये भेल संकुलातील विद्यार्थिनी *कु. अदिती अमोल कुलकर्णी हिने 17 वर्ष (मुली) या गटातून या स्पर्धेत बाजी मारत विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे, तर मुलांमध्ये *चि. गुट्टे शिवम परमेश्वर* 14 वर्षे (मुले) आणि *चि. दिग्विजय शंकर महाजन* 17 वर्षे (मुले) या दोघांचीही निवड झालेली आहे. या निवड झालेल्या सर्व विजेत्या मुला- मुलींचे श्री. जुगलकिशोर लोहिया (अध्यक्ष,स्थानिक समन्वय समिती), श्री. जीवनराव गडगूळ (कार्यवाह) श्री. अमोल दुबे (अध्यक्ष शालेय समिती),सौ. भंडारी मॅडम (माजी प्राचार्या, सदस्य) श्री. गिरीश ठाकुर सर (मुख्याध्यापक), सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद, पालक, मित्रपरिवार आणि शहरातील अनेक नामवंत खेळाडूंकडूनही अभिनंदनाचा वर्षाव विजेत्यावर होत आहे. वरील सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना प्रोत्साहित केले, अशी माहिती भेल संकुलाचे प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रफुल्ल सर यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा