25 ऑगस्ट रोजी परळीत मराठवाड्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव: सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा - सुनील गुट्टे
25 ऑगस्ट रोजी परळीत मराठवाड्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव: सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा - सुनील गुट्टे
परळी ,प्रतिनिधी.
येत्या 25 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचा सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक उद्योजक सुनील गुट्टे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
याबाबत पत्रकारांशी बोलताना सुनील गुट्टे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील हालगे गार्डन, वैद्यनाथ मंदिराच्या बाजूस या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 यादरम्यान या नोकरी महोत्सवाचे आयोजन होत आहे.या नोकरी महोत्सवात 50 कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. कमीत कमी पाचवी पास ते पदवीधर ,आयटीआय, डिप्लोमा आणि अंतिम वर्षे पदवी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
याबरोबरच आयटी ,बँकिंग, किरकोळ क्षेत्र, बीपीओ, फार्मसी, हॉटेल, विमा, साखर उद्योग, बिसलेरी, ऊर्जा, दूरसंचार विभाग, सुरक्षा सुविधा, इ कॉमर्स, वैद्यकीय आणि आरोग्य सेवेत बेरोजगार युवक तसे युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या नोकरी महोत्सवात ऑनलाईन नाव नोंदणीसाठी 78 22 83 25 83 तसेच 87 88 34 58 50 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करावी.आतापर्यत अशा प्रकारच्या तीन नोकरी महोत्सवातून 10 हजार पेक्षा अधिक तरुण-तरुणींना नोकरी मिळवून दिल्याचे सुनील गुट्टे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे पुणे येथील सुनील गुट्टे यांचे सहकारी महेश बडे हे सुद्धा उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा