डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळीत मॉर्निंग वॉक करत 'निर्भय बनो' चा संदेश
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परळीत मॉर्निंग वॉक करत 'निर्भय बनो' चा संदेश
परळी प्रतिनिधी -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त परळी शाखेच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी परळीत निर्भयपणे अभियान अंतर्गत मॉर्निंग वॉक करण्यात आले तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा खरा सूत्रधार पोलिसांना सापडलेला नाही. तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतिदिन महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय बनो अभियान अंतर्गत सकाळी मॉर्निंग वॉक करून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने परळी शहरातील जिजामाता उद्यानात परळी शाखेच्या वतीने सकाळी सात वाजता मॉर्निंग वॉक करण्यात आले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य हितचिंतक यांनी मॉर्निंग वॉक करताना डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमा हातात घेतल्या होत्या. डॉ.नरेंद्र दाभोळकर अमर रहे, फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर, विज्ञानाचे कास धरू अंधश्रद्धा दूर करू अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. या मॉर्निंग वॉक मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य जी.एस.सौंदळे,बीड जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा. विलास रोडे, कार्याध्यक्ष रानबा गायकवाड, प्रधान सचिव विकास वाघमारे, विठ्ठलराव झिलमेवाड, विकास नवनाथ दाणे, माधव आजले, राहुल सूर्यवंशी, दीपक शिरसाठ, केशवराज मुंडे, विनायक काळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा