प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे सोमवारी आयोजन
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे सोमवारी आयोजन
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
परळी शहरातील पंचवटी नगर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक जवळ शांती भवन येथे सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दहीहंडी, राधाकृष्ण देखावा यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा