कायदा कडक करा

तिला' न्याय द्या; परळीत डॉक्टरांचा भव्य मूक मोर्चा

दिवसेंदिवस डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवा; कायदा कडक करा


परळी,( प्रतिनिधी):- आर.जे. कार वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परळीतून डॉक्टर व सर्व स्तरातील नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढून दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात परळीतील सर्व सामाजिक स्तरातील माता-भगिनीसह अनेकांची मोठी उपस्थिती होती.


छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मूक मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. काळ्या फिती लावून पश्चिम बंगाल येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत हा मूक मोर्चा अण्णाभाऊ साठे चौक, एक मिनार चौक, मोंढा मार्केट राणी लक्ष्मीबाई टावर, येथून परळी शहर पोलीस ठाणे येथे आला. तेथे आल्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात मागणी विषयी निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कोलकत्ता येथील आर. जे. कार वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी काढलेल्या मोर्चावर गुंड जमावाने अमानुष मारहाण केली. दिवसेंदिवस डॉक्टरांविरुद्ध घडत असलेल्या अमानुष कृत्यास शासनाने नवीन व अत्यावश्यक कायद्यांचे निर्माण करून डॉक्टरांना सुरक्षा द्यावी. सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी व्हावी जेणेकरून अशा अमानवी कृत्यांची पुनरावृत्ती होणार नाही. याबद्दलची काळजी शासनाने घ्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. परळी मेडिकल असोसिएशन तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मूक मोर्चात हजारोच्या संख्येने परळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.


कायदा कडक करा - डॉ.शालिनीताई कराड

दिवसेंदिवस डॉक्टरांवर हल्ले होत आहेत, अमानुषपणे अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. मागील काळात अशा खूप घटना घडून गेल्या व आजही घडत आहेत. अशा घटनांना रोखणे हे शासनासमोर मोठे आव्हान असले तरी याला पायबंद घालण्याची आवश्यकता आहे. यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे परळी मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.शालिनीताई कराड यांनी म्हटले.


महिलाची लक्षणीय उपस्थिती

कोलकाता येथे आर जे कार वैद्यकीय महाविद्यालय येथे महिला डॉक्टरवर अमानुषपणे अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परळीत आयोजित मूक मोर्चात महिलांची लक्षणे उपस्थित होती. सर्व सामाजिक कार्यकर्त्या, वकील, डॉक्टर यांच्यासह राजकीय प्रतिनिधी यांचीही लक्षनिय उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार