वेदांच्या विशुद्ध ज्ञानानेच जगात मानवता व शांतता नांदेल- वेदप्रचार सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात श्री ज्ञानप्रकाशजी शास्त्री

वेदांच्या विशुद्ध ज्ञानानेच जगात मानवता व शांतता नांदेल- वेदप्रचार सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात श्री ज्ञानप्रकाशजी शास्त्री 


   परळी वैजनाथ, दि.२१--

             आज सारे जग दुःख आणि अशांततेच्या सावटाखाली आहे. मानवनिर्मित मत -संप्रदायाच्या वाढत्या प्रभावामुळे वाईट प्रवृत्ती बळावत असून माणूस हा एक दुसऱ्याचा शत्रू बनत चालला आहे. अशा संक्रमणाच्या युगात स्वामी दयानंदांनी पुनर्मांडणी केलेल्या वेदांच्या विशुद्ध तत्त्वज्ञानानेच संपूर्ण जगात मानवतेची स्थापना होऊन सर्वत्र शांतता व सुरक्षितता नांदू शकेल, असे प्रतिपादन उच्च कोटीचे वैदिक विद्वान आचार्य श्री ज्ञानप्रकाशजी  शास्त्री यांनी केले. 

                येथील आर्य समाजात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या श्रावणी वेद प्रचार सप्ताहाची  नुकतीच सांगता झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते. तर श्री स्वामी सोमानंदजी सरस्वती व श्री वैजनाथराव चिल्ले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री शास्त्री यांनी वेदांचे महत्त्व प्रतिपादन करून आज मोठ्या प्रमाणात व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व विश्वस्तरावर वाढत चाललेल्या भयावह समस्यांविषयी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की जगातल्या प्रत्येक मानवनिर्मित जात-पंथांची वैज्ञानिक दृष्टीकोनातून चिकित्सा करून तर्क व बुद्धीसंगत अशा वेदांच्या विशुद्ध ज्ञानाचा आधार घेत आपले जीवन सर्वदृष्ट्या उन्नत करावे. वेद हे समग्र ज्ञान - विज्ञानाचे व सुख शांतीचे आगर आहेत. आजच्या वैज्ञानिक युगात भौतिक प्रगती बरोबरच आध्यात्मिक प्रगती साधावयाची असेल, तर सत्यज्ञानावर आधारित वेदमार्ग स्वीकारणे गरजेचे आहे .

             प्रारंभी प्रसिद्ध भजनोपदेशक  श्री भूपेंद्रसिंह आर्य व श्री लेखराज आर्य यांनी आपल्या मधुर भजनांच्या माध्यमाने श्रोत्यांना आध्यात्मिक विचारांकडे वळण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले आर्य समाज ही विश्वस्तरावरील संस्था समग्र मानवतेचे कल्याण साधू इच्छिते. सर्वांनी या महान संस्थेच्या विचारांचे अनुयायी बनणे आवश्यक आहे. यावेळी संपन्न झालेल्या वेद पारायण पूर्णाहुती यज्ञात सर्वश्री जुगलकिशोर लोहिया, नंदकिशोर लोहिया, उग्रसेन राठौर,संज्योत लाहोटी हे यजमान सपत्नीक सहभागी झाले. यज्ञाचे पौरोहित्य पं. वीरेंद्र शास्त्री यांनी केले. याप्रसंगी स्वामी सोमानंद सरस्वती, माता आनंदमयी यती यांच्यासह आमंत्रित विद्वान, दानशूर व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा . डॉ.अरुण चव्हाण यांनी केले, तर आभार उग्रसेन राठौर यांनी मानले.                                                                        कार्यक्रमाच्या सफलतेसाठी सर्वश्री देविदासराव कावरे, लक्ष्मणराव आर्य, प्रशांतकुमार शास्त्री, जयपाल लाहोटी, रंगनाथ तिवार, रमेश भंडारी, गोवर्धन चाटे, नयनकुमार आचार्य, योगिराज भारती, रामकृष्ण केकान इत्यादींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?