लाच घेताना परळीत दोघांना रंगेहात पकडले
लाच घेताना परळीत दोघांना रंगेहात पकडले
परळी वैजनाथ प्रतिनिधी
संस्थेच्या लेखापरीक्षणाची फीस कमी करण्यासाठी लाच घेणाऱ्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने परळीमध्ये रंगेहात अटक केली आहे. बीड जिल्ह्यात घडत असलेल्या लाचेच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वानटाकळी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2008 ते सन 2021 या वर्षाचे लेखा परीक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी लागणारे शुल्क कमी करण्यासाठी सेवा सहकारी संस्था वानटाकळीचे सचिव बाबासाहेब धोंडीराम सिगे वय 56 राहणार परळी वैजनाथ व सेवा सहकारी संस्था सारडगावचे सचिव अंकुश पवार राहणार तालखेड तालुका माजलगाव या दोघांनी 1 लाख 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, पर्यवेक्षण अधिकारी सिद्धराम मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार आशिष पाटील, सिद्धेश्वर तावस्कर, सचिन शेवाळे, दत्तात्रेय करडे यांनी सापळा लावला. दिनांक 22. 8. 2024 रोजी 1 लाख 25 हजार रुपयाची लाच स्वीकारताना दोघांनाही पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा