बदलापूर घटना: परळीत महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून निषेध करत प्रशासनाला दिले निवेदन

 बदलापूर घटना: परळीत महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून निषेध करत प्रशासनाला दिले निवेदन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
        बदलापूर येथील शालेय मुलीच्या लैंगिक अत्याचाराची घटना व महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत महाराष्ट्र बंद चे आवाहन केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा बंद मागे घेतलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी काळ्याफिती लावून निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले. त्याच अनुषंगाने परळी येथेही महाविकास आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
         महाविकास आघाडीकडून देण्यात आलेलिया निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,बदलापूर येथे शाळेतील ४ वर्ष व ६ वर्ष वयाचा विद्यार्थिनी वर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केलेला उघड झाला असून प्रकरण दडपण्या साठी शाळेतील संस्थेने व फिर्याद देण्या साठी जाणूनबुजून चालढकल केलेली असून संबंधित प्रत्येक घटकावर कडक कार्यवाही करून आरोपीला कडक शासन करावे व अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी ची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्रात महिलांवर व विद्यार्थिनी वर होत असलेल लैंगिक अत्याचार थांबवण्या साठी आरोपीना तत्काळ कडक शासन करण्याच्या दृष्टी ने कार्यवाही करावी, व महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षे बाबत कठोर कार्यवाही करावी. बदलापूर येथे बाल विद्यार्थिनी वर झालेला अत्याचाराचा महाविकास आघाडी परळी जाहीर निषेध करीत आहे.शासनाने जर तत्काळ आरोपीला शिक्षा देणे बाबत कठोर पाऊले उचलली नाही तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.
        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई गुट्टे, किरण काका पवार,रा.काॅ.शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख, देवराव लुगडे, फिरोजभाई मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पांडुरंग राठोड,परमेश्वर गित्ते आदीसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !