परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

आंध्रप्रदेशच्या 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल

पाठलाग करत गाढव चोरून नेणारी टोळी पोलिसांनी पकडली

आंध्रप्रदेशच्या 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल


माजलगाव दि.२३(प्रतिनिधी) शहरातून आयशर टेम्पो मध्ये गाढव चोरून नेणारी टोळी माजलगाव शहर पोलिसांनी पकडली.ही कार्यवाही शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान  धारूर रोड एलआयसी ऑफिस समोरुन पाठलाग करत चाठबोरगाव (सेलू) येथे करण्यात आली.दरम्यान आंध्र प्रदेशच्या 6 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत माहिती अशी की,शुक्रवारी मध्यरात्री सुरू असलेल्या गस्ती पथकाला खबऱ्या मार्फत माहिती समजली की,भुरकट रंगाचा आयशर टेम्पो(ए.पी.टी.7503) यामध्ये गाढव चोरून नेल्या जात आहेत.यावरून पोलिसांनी सापळा रचला.धारूर रोड एलआयसी ऑफिस समोर टेम्पो आला.परंतु टेम्पो चालकाने पोलिसांना पाहताच टेम्पो वेगाने पळवला.दरम्यान पोलीस वाहन चालक गायकवाड यांनीही त्याच गतीने टेम्पोचा पाठलाग करत गाढव चोरून नेणारा टेम्पो परभणी जिल्ह्यातील चाठबोरगाव (सेलू) येथे पकडला. बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना टेम्पोमध्ये 14 गाढवे दिसून आली. सुदृढ एका गाढवाची किंमत दहा हजार तर कृश असणाऱ्या एका गाढवाची किंमत आठ हजार आहे. एकूण पकडलेल्या 14 गाढवाची किंमत एक लाख 11 हजार असून सदरील गाढवे शहर ठाण्यात जमा केली आहेत.पोलिसांनी परिसरात गाढवाचा वीट वाहतुकीसाठी उपयोग करणाऱ्या व्यक्तींना बोलावून घेतले.त्यावेळी त्यांना समजले की त्यांची गाढवे चोरून नेली होती.दरम्यान अंकुश काशिनाथ घेणे राहणार भुई गल्ली यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक 1)आप्पालारामलू रा.चिरायला जिल्हा प्रकाशन आंध्र प्रदेश, 2)महेश रेड्डी,3)श्रीनिवासन याच्यासह इतर तिघाजणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतरांचा शोध सुरू आहे.ही कार्यवाही नव्याने रुजू झालेली पो.नि.राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. गणेश तळेकर,पो.हे.कॉ.अनिल भालेराव,पो.कॉ.महेश चव्हाण, पोलीस वाहन चालक गायकवाड यांनी पार पाडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!