परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ड्रोनमुळे नागरिकांत भिती ; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी

 अज्ञात ड्रोनच्या घिरटयांचा पोलीस प्रशासनाने तातडीने शोध घ्यावा 


आ. पंकजाताई मुंडे यांनी उप मुख्यमंत्र्यांसह एसपींकडे केली पत्राद्वारे मागणी


ड्रोनमुळे नागरिकांत भिती ; पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी


बीड।दिनांक २३।

गेल्या काही दिवसांपासून  अहमदनगर व बीड जिल्ह्यात ड्रोनच्या घिरट्याने ग्रामीण भागातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    चोरीच्या भीतीने नागरिक रात्र जागून काढत आहेत. हा प्रकार नेमका काय आहे? याचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाला संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही जिल्ह्याच्या एसपींकडे एका पत्राद्वारे केली आहे.


   मागील एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, बीड, गेवराई, वडवणी, धारूर यासह अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोन च्या माध्यमातून चोरीसाठीची रेकी करत असल्याची अफवा नागरिकांमध्ये आहे, त्यामूळे नागरिकांची झोप उडाली असून ग्रामस्थांमध्ये दहशत आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   दरम्यान, हया सर्व प्रकारात आपण स्वतः गांभीर्याने लक्ष घालून हा प्रकार नेमका काय आहे? याचा शोध घ्यावा आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भिती पोलीस प्रशासनाकडून दूर करावी तसेच सध्या दोन्ही जिल्हयातील ग्रामीण भागात रात्रीच्या चोऱ्या व दरोडयांचे प्रमाण वाढलेले आहे यासाठी रात्रीच्या गस्त घालणारे पोलीस पथक तयार करुन रात्रीची गस्त वाढवावी तसेच  असे प्रकार करणारांविरूध्द कठोर कारवाई करावी आणि नागरीकांनी भयभीत होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य उपाययोजना कराव्यात अशी विनंती आ. पंकजाताई मुंडे पत्राद्वारे केली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!