पोस्ट्स

आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

MB NEWS: स्व. हिराबेन मोदी यांना पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन

इमेज
 स्व. हिराबेन मोदी यांना  पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात अभिवादन परळी वै, दि.30... भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री रव. हिराबेन यांचे 100 व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. यानिमित्त भाजपच्या राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई मुंडे यांचे संपर्क कार्यालय परळी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, मोहन जोशी, प्रशांत कराड, अॅड. अरुण पाठक, अनिश अग्रवाल, कमलाकर हरेगावकर, विकास हालगे, धनराज कुरील, सुशील हरंगुळे, दिलीप नेहरकर, राहुल केंद्रे, गोविंद मोहेकर, गोविंद चौरे, मिलींद कांबळे, वनमाला ताटे, हेमांक्षी दाभाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

MB NEWS:शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने लढा लढणारे सुनील मगरे हेच मराठवाडा शिक्षक मतदार संघातील आमदारकीचे खरे दावेदार-भैयासाहेब आदोडे

इमेज
  शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने लढा लढणारे सुनील मगरे हेच मराठवाडा शिक्षक मतदार संघातील आमदारकीचे खरे दावेदार-भैयासाहेब आदोडे परळी प्रतिनिधी  मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणुक नुकतीच जाहिर झाली असुन शिक्षकांच्या प्रश्वावर सातत्याने लढा लढणारे मुप्टा शिक्षक संघटनेचे नेते सुनिल मगरेसरांचा विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया मुप्टा शिक्षक संघाचे बीड जिल्हयाचे नेते भैयासाहेब आदोडे यांनी दिली. मागील वीस वर्षापासून सातत्याने शिक्षकांच्या अनुदानाचे प्रश्न असतील वैयक्तिक मान्यतेचे प्रश्न असतील संस्थेचालककडून होणाऱ्या अन्याय बाबत शासन दरबारी वाचा फोडणे असेल  जुनी पेन्शन योजना असेल प्रचलित नियमानुसार अनुदानाचा प्रश्न असेल तसेच एक नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न असेल या व इतर अशा असंख्य प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावरची लढाई लढणारा एकमेव नेता म्हणजे सुनील भाऊ मगरे हेच आहेत त्यांच्या या धडाकेबाज कार्यामुळे व शिक्षक बांधवांनी हाक दिल्यानंतर तात्काळ उपलब्ध होणारे शिक्षकांसाठी पूर्ण वेळ कार्य करणारे  असल्यामुळे ते आज मराठवाड

MB NEWS:महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबईच्या(महानंद) संचालक पदी फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड

इमेज
  महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित मुंबईच्या(महानंद) संचालक पदी फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड निवडीबद्दल  सर्व स्तरातून अभिनंदन परळी, (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजेच महानंद दूध डेरी च्या संचालक पदी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी इतर उमेदवारांनीआपले उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे  फुलचंद कराड यांची सर्वसाधारण मतदार संघातून बिनविरोध निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       परळी तालुका दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संघ मर्यादित परळीचे चेअरमन तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांची महाराष्ट्र राज्य दूध महासंघ (महानंद) दूधडेरी च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.  ही निवड पुढील पाच वर्षापर्यंत राहणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मुंबईचे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. आज हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडला असून फुलचंद कराड सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडीबद

MB NEWS-LIVE:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
  LIVE:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :अंतिम आठवडा प्रस्तावावर  उत्तर 

MB NEWS:न.प.विरुद्ध काँग्रेसचे 9 जानेवारी रोजी आंदोलन

इमेज
  न.प.विरुद्ध  काँग्रेसचे 9 जानेवारी रोजी आंदोलन काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नांचा न.प.ला विसर पडल्याने हे आंदोलन-बहादुरभाई परळी (प्रतिनिधी)  मागील एक वर्षापासुन काँग्रेस पक्षाच्या वतिने दुबार टेंडरची चौकशी,झालेल्या कामाची निविदा काढुन कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी,कामाची गुणवत्ता बाबत श्वेत पञिका प्रसिध्द करावी या मागणीचे कॉंग्रेसच्या वतिने वेळोवेळी मागणी करुनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने दि.9 जानेवारी रोजी न.प.च्या भ्रष्ट कारभाराचा  काळे झेंडे दाखवुन निषेध करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई यांनी यांनी सांगितले.   शासनाच्या विविध योजनांमधुन आलेल्या निधीतून परळी शहरात अंदाजपत्रकाप्रमाणे न झालेल्या कामांची चौकशी करुन श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी यासह मनमानी पणाने लावलेला कर रद्द करावा,रस्ते,नाल्या,स्वच्छता व घरकुल बाबत काँग्रेस पक्षाच्या वतिने निवेदन दिली परंतु आजतागायत एकाही प्रश्नाची सोडवणुक केली गेली नाही.म्हणुन आज शुक्रवार दि.30 डिसेंबर रोजी परत न.प.प्रशासनाला शहर काँग्रेसच्या वतिने शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वात निवेदन देत दि.9

MB NEWS:पंतप्रधान मोदींना मातृशोक:आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचं भावुक ट्विट

इमेज
  पंतप्रधान मोदींना मातृशोक: आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचं भावुक ट्विट हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तत्काळ त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी हिराबेन यांचे एमआरआय आणि सीटी स्कॅन करुन त्यांच्यावर पुढील उपचार सुरु केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून गुरुवारी निवेदन देण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालंय. वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बुधवारी सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अहमदाबादच्या 'यू एन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजी एंड रिसर्च सेंटर' रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर पंतप्रधान मोदी राजधानी नवी दिल्लीहून अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. तत्पूर्वी ट्विट करुन त्यांनी

MB NEWS:Live - आ. धनंजय मुंडे हे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत आहेत.

इमेज
Live - आ. धनंजय मुंडे हे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत आहेत.

MB NEWS:धर्मांतरास प्रवृत्त करणाऱ्यास अटक

इमेज
  धर्मांतरास प्रवृत्त करणाऱ्यास अटक         आटपाडी येथील ख्रिस्ती धर्म प्रचारक संजय गेळेस अखेर सांगलीत आटपाडी पोलीसांनी अटक केली. आटपाडी येथील वरद हॉस्पीटलमध्ये संजय गेळे व त्यांची पत्नी अश्विनी या दोघांनी अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटीलेटरवर असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून तंत्रमंत्र, अंधश्रध्दा पसरवली होती. याबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली होती. आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आणि प्रमोद रोडे,शंकर पाटील यांनी बुधवारी (दि.२८) रात्री सापळा रचून संजय गेळेला अटक केली. परंतु त्याची पत्नी अश्विनी मात्र, अद्याप फरार आहे. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे.  वरद हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना न जुमानता धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. रुग्णांना टार्गेट करून ही मोहीम राबविली जात आहे. धर्मपरिवर्तन करण्यास प्रवृत्त करणारे व अंधश्रध्दा पसरवण्याचा प्रकार तालुक्यात उघडकीस आला. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी गेळेदाम्पत्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. मोर्चा काढून या घटनेचा तीव्र

MB NEWS:विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

इमेज
  विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, ५ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपमध्ये सामना   महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ असून त्यापैकी पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या संदर्भात ५ जानेवारीला अधिसूचना निघणार आहे.     पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही पार पडणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळारा

MB NEWS:७० वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

इमेज
७० वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत गेवराई:  शहरातील बसस्थानक परिसरात एका ७० वर्षीय वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने  खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अवघ्या काही तासातच आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. ज्ञानेश्वर लक्ष्मण घूबांर्डे (वय ३१, रा. गेवराई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर घूबांर्डे याने गेवराई बसस्थानक परिसरातील एका फळ विक्रेत्या ७० वर्षीय महिलेवर मध्यरात्री अत्याचार केला. दरम्यान, पीडितेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा या वयोवृध्द महिलेच्या परिचयाचा होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गेवराई शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातून अटक केली आहे. या परिसरातील एका दुकानाच्या सिसिटिव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाला होता. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय तुपे यांनी केली आहे.

MB NEWS: संयम व शिस्तबद्ध मुकमोर्चा पण भावना तीव्र

इमेज
  लव्ह जिहाद व धर्मांतरण कायदा : परळी वैजनाथ येथे हिंदु जनसागर रस्त्यावर!   संयम व शिस्तबद्ध मुकमोर्चा पण भावना तीव्र बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी, महिला,अबाल वृद्धांनी व सर्वस्तरीय हिंदु बंधु भगिनींनी  उस्फुर्त सहभाग   प रळी वैजनाथ (प्रतिनिधी):देशभरात लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटना रोज घडत आहेत या विरोधात आज परळी वैजनाथ येथे हिंदू समाज प्रचंड संख्येत रस्त्यावर उतरला.विराट हिंदू मोर्चाने परळी शहर दणाणले.तर बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी, महिला,अबाल वृद्धांनी व सर्वस्तरीय हिंदु बंधु भगिनींनी  उस्फुर्त सहभाग घेतला.        आज परळी वैजनाथ  येथे हिंदू धर्मरक्षण मुक मोर्चाचे आयोजन समस्त हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले.देशभरात मागील काही काळा पासून लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटनांत वाढ झाली आहे नुकत्याच श्रद्धाच्या घटनेने देश सुन्न झाला. रोज कुठेना कुठेतरी अश्या घटना घडत आहेत हिंदू धर्मातील लेकी सुरक्षित राहण्यासाठी हिंदू समाजाची एकजूट असणे गरजेचे असल्याचे हिंदू धर्मरक्षण मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव एकवटला होता.मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय ह

MB NEWS:डॉ.संजय गित्ते यांना मातृशोक ;सौ.कुसुमबाई गित्ते यांचे निधन

इमेज
 डॉ.संजय गित्ते यांना मातृशोक ; सौ.कुसुमबाई गित्ते यांचे निधन परळी, (प्रतिनिधी):- शहरातील शारदा नगर येथील रहिवाशी सौ.कुसुमबाई फुलचंदराव गित्ते वय ६५ वर्ष यांचे बुधवार दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर परळीतील सार्वजनिक स्मशानभूमी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संजय फुलचंदराव गित्ते यांच्या त्या मातोश्री होत्या. परळीतील शारदा नगर येथे वास्तव्यात असलेले व तालुक्यातील नंदागौळ येथील मुळ रहिवाशी असणारे फुलचंद कोंडीबा गित्ते यांच्या पत्नी सौ.कुसुमबाई फुलचंदराव गित्ते यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. धार्मिक व मनमिळावू म्हणून त्या सर्वपरिचित होत्या त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परळीतील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तसेच डॉक्टर, पत्रकार यांच्यासह इतर उपस्थित होते. एस.टी. कामगार संघटनेचे नेते रमेश गित्ते व भाजपा युवा नेते गणेश गित्ते यांच्या त्या चुलती होत्या. गित्ते कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज  परिवार सहभागी आहे. शुक्रवारी राख सावडण्याचा विधी सौ.कुसुमबाई फुलचंदराव गित्ते यांचा राख सावडण्याचा विधी शुक्रवार द

MB NEWS:एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून डॉक्टरची ७५ हजारांची फसवणूक

इमेज
  एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून डॉक्टरची ७५ हजारांची फसवणूक        माजलगाव :  फ्लिपकार्टवरुन आलेले पार्सल परत करण्यासाठी गुगलवर कंपनीचा कस्टमर केयर नंबर सर्च करणे, एका डॉक्टरांना चांगलेच महागात पडले. गुगलवरील नंबर अनेकदा सायबर गुन्ह्यातील आरोपींनी अपलोड केल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. संबंधीत डॉक्टरांनी गुगल सर्च करून एक मोबाईल नंबर मिळवला. मात्र, त्या मोबाईलवरून बोलणार्‍या लुटारूने त्यांना एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्याने मोबाईलमधील सर्व डाटा संबंधीत लुटारुला कळाला. त्याने  डॉक्टरांच्या खात्यातील ७५ हजारांची रक्कम विड्रॉल करत चुना लावला. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शामसुंदर दगडूराम काकणी (रा.समता कॉलनी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. फ्लिपकार्टवर त्यांनी एक पार्सल मागवले होते. मात्र, ते पार्सल त्यांना परत करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून फ्लिपकार्ट कस्टमर केयरचा नंबर शोधला. तेथे त्यांना इंडिया कस्टमर केयर असा उल्लेख आढळला. तसेच त्याठिकाणी कॉल नॉउ असा उल्लेख असल्य

MB NEWS:नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांची प्रकृती बिघडली

इमेज
  नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांची प्रकृती बिघडली अहमदाबाद येथील मेहता रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना दाखल करण्यात आले आहे. हिराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अहमदाबाद:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांची प्रकृती बिघडली आहे. हिराबेन यांना अहमदाबाद येथील युएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला दाखल होणार आहेत. यामुळेच मेहता रुग्णालयातबाहेर गर्दी देखील वाढली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मुख्य सचिव के कैलाशनाथन हे रुग्णालयात पोहोचले आहेत. PM मोदी यांच्या आई हिराबेन यांनी १८ जूनला १००वा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा मोदींनी गांधीनगर येथील निवासस्थानी येऊन आईची भेट घेतली होती. मोदींनी तेव्हा एक ब्लॉग देखील लिहला होता.

MB NEWS:बीड जिल्ह्यात एसीबीची धडक मोहिम:दिवसभरात पाच लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

इमेज
  बीड जिल्ह्यात एसीबीची धडक मोहिम:दिवसभरात पाच लाचखोर एसीबीच्या जाळ्यात बीड  दि. २८ - सॉमिलमधील लाकडी मशिनचा परवाना नुतनीकरण करून कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना वन विभागातील चौघे व मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना सरपंच पुत्राला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. २८) समोर आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिवसभरात पाच जणांवर कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बीडमधील सॉ मिल धारकांकडे वन विभागील तिघा - चौघांनी प्रत्येकी ५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती २ हजार रूपये देण्याचे ठरले होते. सर्व सॉ मिलधारकांकडून प्रत्येकी २ हजार याप्रमाणे ५० हजार रूपये देण्याचे ठरल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तक्रारदाराने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. पडताळणीनंतर बुधवारी (दि. २८) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जालना येथील एसीबीच्या टीमने सापळा लावून कुर्ला रोडवरील एका सॉमिलच्या ठिकाणी वनरक्षक जाधव, चालक भालेराव, वनरक्षक शेख अकबर यांना ५

MB NEWS:तब्बल एक वर्ष, एक महिना आणि 2७ दिवसांनी सुटका

इमेज
  मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगाबाहेर तब्बल एक वर्ष, एक महिना आणि 2७ दिवसांनी सुटका         मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज (दि.२८) आर्थर रोड तुरुंगातून सायंकाळी पाच वाजता सुटका झाली. तब्बल एक वर्ष, एक महिना आणि 2७ दिवसांनी अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी  राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील,  छगन भुजबळ, सुप्रिया सूळे आणि अनिल देशमुख यांचे कुटुंबीय तुरुंगाबाहेर उपस्‍थित होते. अनिल देशमुख तुरुंगा बाहेर येताच त्‍यांना खाद्यांवर उचलून घेत राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्यांनी  एकच जल्‍लोष केला. अनिल देशमुख यांना दहा दिवसांपूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता. तथापि, सीबीआयने त्याविरोधात दाद मागितल्यामुळे दहा दिवसांची स्थगिती न्यायालयाने स्वतःच्या आदेशाला दिली होती. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा सीबीआयने मुदतवाढ मागितली. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यामुळे देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता अनिल देशमुख यांचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यांची आज सुटका होत आहे. कोणत्याही आरोपाविना त्यांना तेरा म

MB NEWS:पप्‍पू म्‍हटलं तर वाईट वाटंत का? राहुल गांधींनी दिले उत्तर, "ते माझ्‍या आजीलाही..."

इमेज
  पप्‍पू म्‍हटलं तर वाईट वाटंत का? राहुल गांधींनी दिले उत्तर, "ते माझ्‍या आजीलाही..." विरोधक ‘पप्‍पू’ नावाने संबोधित करतात यावर तुम्‍हाला कसं वाटतं, या प्रश्‍नावर काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी  यांनी सडेतोड प्रत्‍युत्तर दिले आहे. भारत जोडो यात्रेवेळी एका मुलाखतीमध्‍ये राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. राहुल गांधी म्‍हणाले की, “मला विरोधी पक्षाातील कोणी पप्‍पू म्‍हणत असेल तर यामध्‍ये चुकीचे असे काहीच नाही. कारण हा विरोधी पक्षाच्‍या प्रचाराचा एक भाग आहे. ते भयभीत आहे. विरोधी पक्षाच्‍या मनात एक मोठी भीती आहे. काँग्रेसच्‍या भारत जोडो यात्रेमुळे विरोधक नाराज आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून बोचरी टीका होत आहे. कोणत्‍या नावाने हाक मारली जाते याने मला काहीच फरक पडत नाही. मी तर त्‍यांना नेहमी आवाहन करतो की तुम्‍ही माझे नाव घेत जावा.” माझ्या आजीला हेच लोग गूंगी गुडिया म्‍हणत असत हेच लोक (विरोधक) माझी आजी इंदिरा गांधी यांना गूंगी गुडिया म्‍हणत असेत. मात्र अचानक त्‍यांच्‍यासाठी गूंगी गुडिया ही आयर्न लेडी झाली. मात्र माझी आजी नेहमीच आयर्न लेडी होती, असेही त्‍यांनी विरो

MB NEWS:हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा: परळीतील व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त पाठिंबा:उद्या दुपारपर्यंत व्यापार पेठ बंद ठेवून मोर्चात होणार सहभागी

इमेज
  हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा: परळीतील व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त पाठिंबा:उद्या दुपारपर्यंत व्यापार पेठ बंद ठेवून मोर्चात होणार सहभागी परळी वैजनाथ :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात परळीतील व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असून या मोर्चासाठी उद्या दिनांक 29 रोजी दुपारपर्यंत परळीची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे त्याचबरोबर या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.         जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या

MB NEWS-"त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

इमेज
  सहकारी शिक्षकाने शिवीगाळ करून मारहाण केली: आपमान सहन न झाल्याने केली शाळेतच आत्महत्या  "त्या" शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल  सोनपेठ, प्रतिनिधी....            गंगाखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रुमणा पाटीवर शिवीगाळ करून मारहाण केल्याने अपमानित झालेले शिक्षक विठ्ठलराव अनंतराव रत्नपारखी यांनी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी दहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सोनपेठ पोलीस ठाण्यात दिनांक 26 डिसेंबर रोजी   दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धारासुर तांडा येथील जिल्हा परिषद शिक्षक राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धारासुर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मयत रत्नपारखी यांना सोमवारी सकाळी आरोपी शिक्षक राठोड यांनी फोन करून धारासुर शाळेवर येण्यास सांगितले. तेव्हा मयत शिक्षक रत्नपारखी यांनी मी पंचायत समितीत नोकरीवर आहे शाळेत येऊ शकत नाही असे आरोपीस सांगितले. आरोपी शिक्षकाने फोनवर अरेरावीची भाषा वापरल्याने मयत शिक्षक

MB NEWS:पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी

इमेज
  पंतप्रधान मोदी यांच्या भावाच्या कारला अपघात : तिघे गंभीर जखमी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाला. म्हैसूर तालुक्यातील काडाकोलाजवळ आज (दि२७) झालेल्या अपघातात प्रल्हाद मोदी यांच्यासह त्यांचा नातू आणि सून गंभीर जखमी झाले आहेत. प्रल्हाद मोदी त्यांच्या मर्सिडीज बेंझ कारने बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नातूही कारमध्ये होते. या अपघातात प्रल्हाद मोदी, त्यांची सून आणि नातू गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा आणि चालक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने म्हैसूरच्या जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

MB NEWS:प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसादर्भात धनंजय मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

इमेज
  औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवा - धनंजय मुंडे यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही - फडणवीसांचे आश्वासन नागपूर (दि. 28) - परळी वैद्यनाथ सह  राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे नोकरी देणे व अन्य मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी ऊर्जा प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केलेल्या एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र येथील काही प्रकल्पग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने वेळोवेळी

MB NEWS:परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते

इमेज
  परळी पेंटर युनियन च्या माध्यमातून पेंटराच्याच्या विविध समस्या साठी लढणार - पिराजी किर्ते  परळी प्रतिनिधी - शहरातील पेंटर युनियनच्या माध्यमातून लढणार असल्याचे प्रतिपादन पिराजी  किर्ते यांनी केले. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.परळी येथील जिजामाता उद्यान येथे पेंटर युनियनची नुकतीच बैठक संपन्न झाली.      पेंटर युनियनचे अध्यक्ष पिराजी किर्ते म्हणाले की, वाढती महागाई पाहता पेंटर लेबर ची मजुरी वाढवून देण्यात यावी.तसा  ठराव यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.    यावेळी पेंटर युनियनची कार्यकारणी निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून पिराजी कीर्ती, तर उपाध्यक्ष सय्यद ताहीर भाई ,सचिव संतोष रोडे, कोषाध्यक्ष गंगाधर वाघमारे यांची निवड करण्यात आली.तर सदस्य राजेश शिंदे,राजेश होके, बालाजी देशमुख,विनोद वाघमारे , विनोद आचार्य ,संघपाल कसबे, निलेश जाधव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली  यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ओमकार मिरकले, बाळू फुन्ने,  सतीश गोरे ,शिवाजी दराडे,देविदास मिरकले ,पद्माकर सरोदे ,शिवाजी केसापुरी, लक्ष्मण कांबळे, प्रशांत सोनवणे, विठ्ठल जाधव ,सुनील गायकवाड, दीपक व्हावळे ,कन

MB NEWS:सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर

इमेज
  सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर         :  सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधातील ठराव विधीमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदरसह कारवार महाराष्ट्रात आणणार, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. ठराव मांडण्यात आल्यानंतर विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली. सीमेवरील ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. बेळगाव, निपाणी, बिदर, कारवार, भालकीसह ८६५ गावे महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सीमा भागात काम करणाऱ्या मराठी संस्था, संघटनांना अर्थ सहाय्य केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जागा राखीव ठेवण्यात येईल. सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. ८६५ गावातील नागरिकांना महाराष्ट्राचे नागरिक समजण्यात येईल. त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक विकासासाठी आर्थिक मदत केली जाईल. तसेच अनेक योजनांसाठी निधी दिली जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे  यांनी केली. द

MB NEWS:लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी

इमेज
  29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा   लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा- प्रमुख मागणी परळी वैजनाथ :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.         जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा  मुकमोर्चा गुरूवार दि 29 डिसेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत निघणार आहे.       या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे. ● असा असेल मोर्

MB NEWS:एमपीएससी मार्फत पात्र ठरलेल्या स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय

इमेज
 'त्या' 111 उमेदवारांनाही एमपीएससी मार्फत नियुक्ती देण्यात येणार - उपमुख्यमंत्र्यांची धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर घोषणा एमपीएससी मार्फत पात्र ठरलेल्या स्थापत्य अभियंत्यांना मिळणार न्याय नागपूर (दि. 27) - राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र ई डब्ल्यू एस कोट्यातून आरक्षणाची अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्ती साठी राज्य सरकार मॅट कडे भक्कमपणे बाजू मांडणार असून, या सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळवून देणार असल्याची घोषणा आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना केली आहे.    राज्य लोकसेवा आयोगाने 2019 साली आयोजित केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत एकूण 1143 उमेदवार पात्र ठरले होते. यांपैकी 1032 उमेदवारांना काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याचे लक्षात आल्याने तसेच नियुक्ती मिळण्यासाठी उमेदवारांनी उपोषणाचे व आंदोलनाचे अस्त्र उपसल्याने दि. 1 डिसेंबर रोजी 1032 उमेदवारा