MB NEWS:धर्मांतरास प्रवृत्त करणाऱ्यास अटक

 धर्मांतरास प्रवृत्त करणाऱ्यास अटक




       आटपाडी येथील ख्रिस्ती धर्म प्रचारक संजय गेळेस अखेर सांगलीत आटपाडी पोलीसांनी अटक केली. आटपाडी येथील वरद हॉस्पीटलमध्ये संजय गेळे व त्यांची पत्नी अश्विनी या दोघांनी अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटीलेटरवर असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून तंत्रमंत्र, अंधश्रध्दा पसरवली होती. याबाबत संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली होती.

आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आणि प्रमोद रोडे,शंकर पाटील यांनी बुधवारी (दि.२८) रात्री सापळा रचून संजय गेळेला अटक केली. परंतु त्याची पत्नी अश्विनी मात्र, अद्याप फरार आहे. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे.  वरद हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना न जुमानता धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

रुग्णांना टार्गेट करून ही मोहीम राबविली जात आहे. धर्मपरिवर्तन करण्यास प्रवृत्त करणारे व अंधश्रध्दा पसरवण्याचा प्रकार तालुक्यात उघडकीस आला. विविध हिंदुत्ववादी संघटनांनी गेळेदाम्पत्यावर तात्काळ कारवाई करावी, त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. २५ डिसेंबरला आटपाडी शहरात एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला होता. दरम्यान, आज (दि.२९) संशयित आरोपी संजय गेळेला आटपाडी न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !