इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS:एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून डॉक्टरची ७५ हजारांची फसवणूक

 एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून डॉक्टरची ७५ हजारांची फसवणूक




      
माजलगाव : फ्लिपकार्टवरुन आलेले पार्सल परत करण्यासाठी गुगलवर कंपनीचा कस्टमर केयर नंबर सर्च करणे, एका डॉक्टरांना चांगलेच महागात पडले. गुगलवरील नंबर अनेकदा सायबर गुन्ह्यातील आरोपींनी अपलोड केल्याचे यापूर्वी अनेकदा स्पष्ट झाले आहे. संबंधीत डॉक्टरांनी गुगल सर्च करून एक मोबाईल नंबर मिळवला. मात्र, त्या मोबाईलवरून बोलणार्‍या लुटारूने त्यांना एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्याने मोबाईलमधील सर्व डाटा संबंधीत लुटारुला कळाला. त्याने  डॉक्टरांच्या खात्यातील ७५ हजारांची रक्कम विड्रॉल करत चुना लावला. याप्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. शामसुंदर दगडूराम काकणी (रा.समता कॉलनी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. फ्लिपकार्टवर त्यांनी एक पार्सल मागवले होते. मात्र, ते पार्सल त्यांना परत करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च करून फ्लिपकार्ट कस्टमर केयरचा नंबर शोधला. तेथे त्यांना इंडिया कस्टमर केयर असा उल्लेख आढळला. तसेच त्याठिकाणी कॉल नॉउ असा उल्लेख असल्याने त्यावर त्यांनी क्लिक केले. दरम्यान, एक नंबर स्क्रिनवर दिसला.

काकणी यांनी त्या नंबरशी संपर्क केला असता समोरून बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने मोबाईलमध्ये एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत डॉ.काकाणी यांनी ते अ‍ॅप डाऊनलोड केले. इथेच त्यांची फसवणूक झाली. पार्सल तर परत पाठवता आलेच नाही. मात्र, संबंधित लुटारूने त्यांच्या खात्यातील ७५ हजार रुपयांना चुना लावला. माजलगाव शहर ठाण्यात डॉ.काकाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या