परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी... शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तरीय तपासणीसाठी उप
बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान ? (संपुर्ण आकडेवारी) परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली.यावेळी मतदान टक्केवारी बर्यापैकी वाढलेली दिसुन येत आहे. बीड लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उत्साहात मतदान पार पडले. जिल्हा वास यांनी यंदा कधी नव्हे ते भरभरून मतदान करत तब्बल 71 टक्के चा टप्पा गाठला. सर्वाधिक मतदान हे आष्टी तालुक्यात तर सर्वात कमी मतदान बीड मतदार संघात झाले आहे. परळी वैजनाथ मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवर चांगले मतदान झाले. परळी मतदार संघात 71.31 टक्के मतदान झाले.एकंदरीत मतदार संघात एकुण मतदान केंद्रावरील मतदान किती झाले याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात कोणत्या गावात किती मतदान झाले याची प्रत्येक मतदान केंद्रनिहाय (बुधवारईज) आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. ● टिप : एमबी न्युज च्या माहितीसाठी ही केवळ संकलित आकडेवारी देत आहोत.त्यामुळे ही माहिती तंतोतंत आहे असा आमचा दावा नाही.निवडणुक विभागाकडून मतदानाची आकडेवारी अधिकृत समजावी ही विनंती.
ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... शहरातील एका ज्युस सेंटरमध्ये आलेल्या ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त झाले.या ज्युस सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका युवकाने या मुलींचा व्हिडिओ फोटो घेण्याचे हे ग्रहणास्पद हे कृत्य केल्याने मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.दरम्यान मध्यवर्ती ठिकाणीच हा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व बघ्यांची गर्दी झाली होती. प्राप्त माहितीनुसार, परळीतील उपजिल्हा रुग्णालयाजवळ मुख्य रस्त्यावरच असलेल्या लोकमान्य ज्युस सेंटरमध्ये दोन युवती बसलेल्या असताना याच ज्युस सेंटरमध्ये काम करणारा एक युवक वारंवार त्यांच्या टेबलजवळून मोबाईल हातात धरुन ये-जा करत होता. ही बाब एका मुलीच्या लक्षात आल्याने तिने आपल्या पालकांना ही बाब कळवली.पालकांनी येउन शहानिशा केली असता या ज्यूस सेंटर मध्ये काम करणाऱ्य मुलाने या युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट केल्याचा प्रकार समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली.काही वेळातच या घटनेने नागरिक संतप्त झाल्याने
महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग! फेसबुकवरची मैत्री परळीतील गृहिणीली आली अंगलट: ब्लॅकमेलिंग, शारिरीक संबंध, मारहाण ते जीवे मारण्या पर्यंतची फरफट:गुन्हा दाखल परळी वैजनाथ प्रतिनिधी फेसबुक वरची मैत्री आपल्या कधीही अंगलट येऊ शकते विशेषतः फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून फेसबुक वरून मैत्री करून अनेक जण महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर जे घडते ते अंगावर काटे आणणारे असते असाच काहीसा प्रकार परळी शहरातील एका गृहिणी सोबत घडला असून याप्रकरणी या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाख दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळी वै येथील शारदानगर भागातील 32 वर्षिय गृहिणी महिलेने फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतरआपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अकबर बबन शेख वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड याने फिर्यादि महिलेशी फेसबुक अकाउन्टवर ओळख करुन घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये मैत्री पुढे गेली. विविध प्रकारची माह
परळीजवळ थरारक आपघात: बोअरची गाडी वीजवाहक तारांना चिकटली; दोन मृत्यूमुखी दोन जखमी परळी वैजनाथ, प्रतिनिधी परळी शहराजवळ दुपारी १२.१५ वा.सुमारास एक थरारक अपघात घडला आहे.बोअरवेल पाडण्यासाठी आलेल्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क आला व करंट उतरून या बोअरच्या गाडीत असलेले दोन मजूर मृत्युमुखी पडले. तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत. मृत्यू पावलेल्या मजुरांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. दोन जखमींवर येथेच उपचार सुरू आहेत. परळी तालुक्यातील वाघबेट येथे पाण्याचा बोर पाडण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरांसह बोरवेल मशीन घेऊन सहा जणांचे एक पथक आले होते. या गावातील बोरवेल पाडण्याचे काम संपल्यानंतर बोरवेलची ही गाडी परळी शहराकडे येत होती. रस्त्यात वीजवाहक तारांना या गाडीचा संपर्क झाला. वीज वाहकतारांचा विद्युत प्रवाह संपूर्ण लोखंडी पाईप असलेल्या या गाडीत उतरला. या गाडीमध्ये एकूण सहा मजूर बसलेले होते. त्यापैकी करंट लागून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जळून जखमी झाले आहेत. बोरवेल वरील हे सर्व मजूर ओडिसा राज्यातील असून गोबिंदा जबलसिंग गौंड
खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या ! परळी वैजनाथ दि १ :- परळी शहर पोलीस ठाणे हद्दीतील बायपास कॉर्नरला जिरेवाडी शिवारात गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे वय ५४ रा.कन्हेरवाडी यांचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्राथमिक प्राप्त माहितीनुसार आत्माराम (बंडू) मुंडे हे काल रात्री घरातून गेले होते. आत्माराम मुंडे यांचे बायपास कॉर्नरला शेत असून त्या ठिकाणी पत्राचे शेड आहे. त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. प्रथमदर्शनी त्यांचा खून झाला असल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले आहेत. ही घटना का व कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने खळबळ उडाली आहे.परळी शहर पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.घटनास्थळावर पोलीस प्रक्रिया सुरु आहे.दरम्यान संपूर्ण पोलीस प्रक्रियेनंतर या घटनेची सविस्तर माहिती पुढे येणार आहे. ----------------------------------------------------
परळीच्या मोंढ्यात तुंबळ हाणामारी: एकाला डोके फुटेपर्यंत केली मारहाण परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... परळीच्या मोंढा मार्केटमध्ये हात गाडीवाले, फुटपाथवर बसणारे व्यावसायिक व फळ विक्रेते हे कुठल्याच नियमाचे पालन न करता एक तर रस्त्यावर बसतात. तसेच इथे जागा मिळविण्यासाठी एकमेकात वाद घालतात असे सर्रास नेहमीचे प्रकार दिसून येतात. या ठिकाणचे फळ विक्रेते , गाड्यावाले आपल्या गाड्यांच्या आजूबाजूस कोणीच बसू नये अशा पद्धतीने वागतात. दुसरा व्यवसायिक जर या गाड्यांच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत बसू लागला तर वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग होतांना दिसतात. Click : ● *दुर्दैवी नकोशी : सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले* या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज या वादाने एक परिसीमाच गाठली. या ठिकाणी एका व्यावसायिकासोबत जागा पकडून बसण्यावरून वाद निर्माण झाला.या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले आणि चार- पाचजणांनी मिळून एका जणास धरून डोक्यात तुंबळ मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.मोंढा परिसरात हा प्रकार घडल्याने या भांडणाची काही क्षणा
खून प्रकरणातील वान्टेड आरोपी दादरमधून पकडला: सपोनि सपकाळ यांची कामगिरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी... खून प्रकरणातील वान्टेड आरोपी दादरमधून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ यांनी गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना या आरोपीला दादर पोलीसांच्या सहकार्याने पकडण्याची कामगिरी बजावली आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात कंत्राटदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2023 कलम 302, 34 आय.पी.सी. अन्वये गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याचा तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ करत आहेत. तांत्रिक तपासा दरम्यान पाहिजे असलेला आरोपी याचे दादर परिसरामध्ये लोकेशन दिसून येत होते. एपीआय सपकाळ यांना दि.१३ रोजी 11.45 वाजता एन. सी. केळकर रोडवर हनुमान मंदिर जवळ पाहिजे आरोपीत हा त्याच्या एका मित्रासोबत अचानक दिसून आला. तसेच ते दोघे सदर ठिकाणाहून निघून जाण्याच्या तयारीत दिसून आले. एपीआय सपकाळ हे सिव्हिल ड्रेसवर एकटेच असल्याने व वेळ कमी असल्याने त्यांनी तात्काळ कबूतरखाना येथील दादर वाहतूक विभागाचे कर्तव्यावरील पोलीस हवालदार 970116/सुरेश भोसल
कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला ! बीड- गावाकडं जाऊन कमळाला मतदान का केले म्हणून कुर्ला येथील अशोक राऊतमारे यांच्या कुटुंबावर गावातील काही लोकांनी बीडच्या घरात घुसून हल्ला केला.दगडफेक करत घरातील सामानाची नासधूस केली.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी 13 मे रोजी बीड लोकसभा निवडणूक साठी मतदान झाले.बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झाले.मात्र सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील पिंपरगव्हाण भागात राहणारे अशोक राऊतमारे यांच्या घरावर काही जणांनी हल्ला केला. तू ब्राम्हण आहेस म्हणून तू कमळाला मतदान केले,कमळाला मतदान का केले म्हणून अनिल पांडुरंग पाटील,दादा सोनवणे,दादा यादव आणि अन्य दोन जणांनी घरात घुसून बेदम मारहाण केली.घरावर तुफान दगडफेक करत सामानाची नासधूस केली.या गंभीर प्रकरणानंतर संबंधित आरोपीवर कलाम 307 सह अन्य कलमा नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा