MB NEWS:पंतप्रधान मोदींना मातृशोक:आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचं भावुक ट्विट

 पंतप्रधान मोदींना मातृशोक:आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचं भावुक ट्विट



हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तत्काळ त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी हिराबेन यांचे एमआरआय आणि सीटी स्कॅन करुन त्यांच्यावर पुढील उपचार सुरु केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून गुरुवारी निवेदन देण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला.


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालंय. वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बुधवारी सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अहमदाबादच्या 'यू एन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजी एंड रिसर्च सेंटर' रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर पंतप्रधान मोदी राजधानी नवी दिल्लीहून अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. तत्पूर्वी ट्विट करुन त्यांनी आईप्रतिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आईला आदरांजली

"शंभर वर्षांचा प्रवास ईश्वरचरणी थांबला. मी माझ्या आईमध्ये नेहमी एक तपस्वी, निष्काम कर्मयोगी आणि मूल्याधिष्ठीत जीवन असे त्रिमुर्ती स्वरुप पाहिले. जेव्हा मी तिच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त भेटलो तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली, जी नेहमी लक्षात राहते की, काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने..", असं भावुक ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.

कोलकाता दौरा रद्द, मोदी अहमदाबादच्या दिशेने रवाना

बुधवारी सकाळी हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तत्काळ त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी हिराबेन यांचे एमआरआय आणि सीटी स्कॅन करुन त्यांच्यावर पुढील उपचार सुरु केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाकडून गुरुवारी निवेदन देण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. सुमारे दीड तास ते येथे थांबले. डॉक्टरांकडून आईच्या प्रकृतीची विचारपूस करून ते दिल्लीला परतले

आईच्या निधनाचं वृत्त समजताच पंतप्रधान मोदी अहमदाबादला रवाना झाले. ते आज कोलकात्याला जाणार होते. हावडा न्यू जलपाईगुडी वंदे भारत ट्रेन आणि मेट्रो लाईनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणीही होणार होती. मात्र आता त्यांचा कोलकात्याला जाण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार