MB NEWS:विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर

 विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, ५ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपमध्ये सामना




 महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ असून त्यापैकी पदवीधरच्या दोन आणि तीन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.


महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या संदर्भात ५ जानेवारीला अधिसूचना निघणार आहे.

    पदवीधरचे दोन आणि शिक्षक मतदारसंघाच्या तीन जागांसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणूकही पार पडणार आहे.


नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.



काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार

काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्नेही आणि युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार होते. त्यांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळं काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या मतदारसंघात देखील निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीनं दोन वर्षांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळं शिक्षक मतदारसंघात देखील विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर, अमरावती पदवीधरमध्ये भाजपनं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणजीत पाटीलला उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळं भाजपसाठी देखील या मतदारसंघातील विजय महत्त्वाचा असेल.


स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाची निवडणूक प्रलंबित


महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघांची निवडणूक देखील प्रलंबित आहे. मात्र, त्या जागांवरील निवडणूक जाहीर झालेली नाही.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार