MB NEWS:हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा: परळीतील व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त पाठिंबा:उद्या दुपारपर्यंत व्यापार पेठ बंद ठेवून मोर्चात होणार सहभागी

 हिंदू धर्म रक्षण मूक मोर्चा: परळीतील व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त पाठिंबा:उद्या दुपारपर्यंत व्यापार पेठ बंद ठेवून मोर्चात होणार सहभागी




परळी वैजनाथ :- राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत.  यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी 29 डिसेंबर रोजी परळी वैजनाथ येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात परळीतील व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार असून या मोर्चासाठी उद्या दिनांक 29 रोजी दुपारपर्यंत परळीची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे त्याचबरोबर या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.


        जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाजाचा  मुकमोर्चा गुरूवार दि 29 डिसेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून निघून तहसील कार्यालय परळी पर्यंत निघणार आहे.या मोर्चास समस्त हिंदू बंधु भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त हिंदू समाजाकडून करण्यात आले आहे.


असा असेल मोर्चाचा मार्ग....

   या मोर्चाची सुरूवात राणी लक्ष्मीबाई टॉवर ते बाजार समिती ते एकमिनार चौक ते बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवान बाबा चौक ते तहसील पर्यंत जाईल. प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चाचा समारोप होणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !