MB NEWS:नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांची प्रकृती बिघडली

 नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन यांची प्रकृती बिघडली





अहमदाबाद येथील मेहता रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना दाखल करण्यात आले आहे. हिराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांची प्रकृती बिघडली आहे. हिराबेन यांना अहमदाबाद येथील युएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला दाखल होणार आहेत. यामुळेच मेहता रुग्णालयातबाहेर गर्दी देखील वाढली आहे.



गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे मुख्य सचिव के कैलाशनाथन हे रुग्णालयात पोहोचले आहेत. PM मोदी यांच्या आई हिराबेन यांनी १८ जूनला १००वा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा मोदींनी गांधीनगर येथील निवासस्थानी येऊन आईची भेट घेतली होती. मोदींनी तेव्हा एक ब्लॉग देखील लिहला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !