इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:बीड जिल्ह्यात एसीबीची धडक मोहिम:दिवसभरात पाच लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

 बीड जिल्ह्यात एसीबीची धडक मोहिम:दिवसभरात पाच लाचखोर एसीबीच्या जाळ्यात




बीड  दि. २८ - सॉमिलमधील लाकडी मशिनचा परवाना नुतनीकरण करून कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना वन विभागातील चौघे व मनरेगा अंतर्गत मंजूर झालेल्या जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना सरपंच पुत्राला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. २८) समोर आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिवसभरात पाच जणांवर कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीडमधील सॉ मिल धारकांकडे वन विभागील तिघा - चौघांनी प्रत्येकी ५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती २ हजार रूपये देण्याचे ठरले होते. सर्व सॉ मिलधारकांकडून प्रत्येकी २ हजार याप्रमाणे ५० हजार रूपये देण्याचे ठरल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तक्रारदाराने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.


पडताळणीनंतर बुधवारी (दि. २८) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जालना येथील एसीबीच्या टीमने सापळा लावून कुर्ला रोडवरील एका सॉमिलच्या ठिकाणी वनरक्षक जाधव, चालक भालेराव, वनरक्षक शेख अकबर यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले तर तक्रारदाराने नाव दिलेल्यापैकी एक कर्मचारी फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान या कारवाईसोबत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

सरपंचपुत्र सुधाकर नंदू उगलामुगले (वय - ३४, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता. केज जी.बीड) याला लाच घेताना पकडले.तक्रारदार यांचे मुलाचे नावे मनरेगा अंतर्गत मंजूर जलसिंचन विहिरीचे कुशल कामगाराचे अनुदानाचे रक्कमेच्या चेकवर आरोपी यांनी त्यांचे आईची (सरपंच श्रीमती आशाबाई नंदू उगलमुगले यांची) सही घेऊन देण्यासाठी तसेच ग्रामसेवक यांना देण्यासाठी असे एकूण २० हजारांची शासकीय पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली. दरम्यान जिल्ह्यात पाच लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!