MB NEWS: संयम व शिस्तबद्ध मुकमोर्चा पण भावना तीव्र

 लव्ह जिहाद व धर्मांतरण कायदा : परळी वैजनाथ येथे हिंदु जनसागर रस्त्यावर!

 


संयम व शिस्तबद्ध मुकमोर्चा पण भावना तीव्र



बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी, महिला,अबाल वृद्धांनी व सर्वस्तरीय हिंदु बंधु भगिनींनी  उस्फुर्त सहभाग 


रळी वैजनाथ (प्रतिनिधी):देशभरात लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटना रोज घडत आहेत या विरोधात आज परळी वैजनाथ येथे हिंदू समाज प्रचंड संख्येत रस्त्यावर उतरला.विराट हिंदू मोर्चाने परळी शहर दणाणले.तर बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी, महिला,अबाल वृद्धांनी व सर्वस्तरीय हिंदु बंधु भगिनींनी  उस्फुर्त सहभाग घेतला.



       आज परळी वैजनाथ  येथे हिंदू धर्मरक्षण मुक मोर्चाचे आयोजन समस्त हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले.देशभरात मागील काही काळा पासून लव्ह जिहाद व धर्मांतराच्या घटनांत वाढ झाली आहे नुकत्याच श्रद्धाच्या घटनेने देश सुन्न झाला. रोज कुठेना कुठेतरी अश्या घटना घडत आहेत हिंदू धर्मातील लेकी सुरक्षित राहण्यासाठी हिंदू समाजाची एकजूट असणे गरजेचे असल्याचे हिंदू धर्मरक्षण मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव एकवटला होता.मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रशासनाला निवेदन देऊन आरोपींना कठोर शिक्षा तसेच धर्मांतर विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली.



          राज्यासह देशात धर्मांतरण कायदा आणावा लव जिहाद विरोधी सरकारने कडक पावले उचलावीत यासाठी परळी येथे आज सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी एक महिन्यापासून तयारी सुरू होती सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकात हिंदू बांधव जमायला सुरुवात झाले मोर्चाला पाठिंबा म्हणून परळीतील व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय कडेकोट बंद ठेवत या महामोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवला. सकाळी दहाच्या दरम्यान निघालेला विराट हिंदू मोर्चा राणी लक्ष्मीबाई टावर - बाजार समिती - अग्रवाल लॉज - स्टेशन रोड - छत्रपती शिवाजी महाराज चौक - जलालपूर रोड - विद्यानगर परिसर मार्गे तहसील परिसरात मोर्चा धडकला.



     या मोर्चासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसून आले. हातात विविध फलक घेऊन हिंदूंनी आपला रोष व्यक्त केला. प्रारंभी टॉवर परिसरात भारत माता,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी हातात पवित्र भगवा ध्वज घेत केले.तहसील प्रांगणात श्रावणी साबणे या युवतीने व दीपा बंग यांनी लव्ह जिहाद या विषयावर मार्गदर्शन केले.



Video News:-


            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !