MB NEWS:डॉ.संजय गित्ते यांना मातृशोक ;सौ.कुसुमबाई गित्ते यांचे निधन

 डॉ.संजय गित्ते यांना मातृशोक ;सौ.कुसुमबाई गित्ते यांचे निधन


परळी, (प्रतिनिधी):- शहरातील शारदा नगर येथील रहिवाशी सौ.कुसुमबाई फुलचंदराव गित्ते वय ६५ वर्ष यांचे बुधवार दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर परळीतील सार्वजनिक स्मशानभूमी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संजय फुलचंदराव गित्ते यांच्या त्या मातोश्री होत्या.
परळीतील शारदा नगर येथे वास्तव्यात असलेले व तालुक्यातील नंदागौळ येथील मुळ रहिवाशी असणारे फुलचंद कोंडीबा गित्ते यांच्या पत्नी सौ.कुसुमबाई फुलचंदराव गित्ते यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. धार्मिक व मनमिळावू म्हणून त्या सर्वपरिचित होत्या त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परळीतील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तसेच डॉक्टर, पत्रकार यांच्यासह इतर उपस्थित होते. एस.टी. कामगार संघटनेचे नेते रमेश गित्ते व भाजपा युवा नेते गणेश गित्ते यांच्या त्या चुलती होत्या. गित्ते कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

शुक्रवारी राख सावडण्याचा विधी
सौ.कुसुमबाई फुलचंदराव गित्ते यांचा राख सावडण्याचा विधी शुक्रवार दि.३० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजता सार्वजनिक स्मशानभूमी परळी येथे होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !