MB NEWS:शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने लढा लढणारे सुनील मगरे हेच मराठवाडा शिक्षक मतदार संघातील आमदारकीचे खरे दावेदार-भैयासाहेब आदोडे

 शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने लढा लढणारे सुनील मगरे हेच मराठवाडा शिक्षक मतदार संघातील आमदारकीचे खरे दावेदार-भैयासाहेब आदोडे



परळी प्रतिनिधी 

मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणुक नुकतीच जाहिर झाली असुन शिक्षकांच्या प्रश्वावर सातत्याने लढा लढणारे मुप्टा शिक्षक संघटनेचे नेते सुनिल मगरेसरांचा विजय निश्चित होणार असल्याची प्रतिक्रिया मुप्टा शिक्षक संघाचे बीड जिल्हयाचे नेते भैयासाहेब आदोडे यांनी दिली.

मागील वीस वर्षापासून सातत्याने शिक्षकांच्या अनुदानाचे प्रश्न असतील वैयक्तिक मान्यतेचे प्रश्न असतील संस्थेचालककडून होणाऱ्या अन्याय बाबत शासन दरबारी वाचा फोडणे असेल  जुनी पेन्शन योजना असेल प्रचलित नियमानुसार अनुदानाचा प्रश्न असेल तसेच एक नोव्हेंबर 2005 पूर्वी लागलेल्या सर्व शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न असेल या व इतर अशा असंख्य प्रश्नासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावरची लढाई लढणारा एकमेव नेता म्हणजे सुनील भाऊ मगरे हेच आहेत त्यांच्या या धडाकेबाज कार्यामुळे व शिक्षक बांधवांनी हाक दिल्यानंतर तात्काळ उपलब्ध होणारे शिक्षकांसाठी पूर्ण वेळ कार्य करणारे  असल्यामुळे ते आज मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार आहेत.शिक्षकांच्या प्रश्वांची जाण आणी त्यांचे प्रश्न सोडवुन घेण्याची क्षमता त्यांची आहे.अहोराञ कष्ट घेतल्यानेच त्यांचा शिक्षक मतदार संघातील आमदार होण्याचा मार्ग निश्चित कोणीच रोखू शकत नाही असे मुप्टा शिक्षक संघाचे बीड जिल्हयाचे नेते भैयासाहेब आदोडे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार