MB NEWS:न.प.विरुद्ध काँग्रेसचे 9 जानेवारी रोजी आंदोलन

 न.प.विरुद्ध  काँग्रेसचे 9 जानेवारी रोजी आंदोलन




काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नांचा न.प.ला विसर पडल्याने हे आंदोलन-बहादुरभाई

परळी (प्रतिनिधी)

 मागील एक वर्षापासुन काँग्रेस पक्षाच्या वतिने दुबार टेंडरची चौकशी,झालेल्या कामाची निविदा काढुन कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी,कामाची गुणवत्ता बाबत श्वेत पञिका प्रसिध्द करावी या मागणीचे कॉंग्रेसच्या वतिने वेळोवेळी मागणी करुनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने दि.9 जानेवारी रोजी न.प.च्या भ्रष्ट कारभाराचा  काळे झेंडे दाखवुन निषेध करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई यांनी यांनी सांगितले.

  शासनाच्या विविध योजनांमधुन आलेल्या निधीतून परळी शहरात अंदाजपत्रकाप्रमाणे न झालेल्या कामांची चौकशी करुन श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी यासह मनमानी पणाने लावलेला कर रद्द करावा,रस्ते,नाल्या,स्वच्छता व घरकुल बाबत काँग्रेस पक्षाच्या वतिने निवेदन दिली परंतु आजतागायत एकाही प्रश्नाची सोडवणुक केली गेली नाही.म्हणुन आज शुक्रवार दि.30 डिसेंबर रोजी परत न.प.प्रशासनाला शहर काँग्रेसच्या वतिने शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वात निवेदन देत दि.9 जानेवारी पर्यंत श्वेत पत्रिका प्रसिध्द केली नाही तर काळे झेंडे दाखवुन निषेध करण्यात येणार असुन याबाबत परळी नगरपरिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ उर्फ बहादुरभाई,उपाध्यक्ष इत्तेशाम खतीब, ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकरसर,चिटणीस शिवाजी देशमुख,प्रवक्ते बदर भाई,युवक विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख,शहर युवक अध्यक्ष धर्मराज खोसे,मकसुद भाई आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !