पोस्ट्स

अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

इमेज
भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड  प्रतिनिधी (परळी वै.):                            येथील भा. शि. प्र. संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भेल संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाकडे काटेकोरपणे लक्ष पुरविले जाते. हे काम केंद्रातील क्रीडा विभाग अगदी कटाक्षाने अविरतपणे करत आहेत. विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या सदृढ राहिला, तरच त्याला ज्ञानार्जन करणे सोपे जाते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या खेळाकडेही येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. *महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड द्वारा आयोजित* परळी येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय वर्षे 14 व 17 या वयोगटातील भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली.            या सर्व खेळाडूंना खो-खो खेळातील सर्व बारकावे, विविध योजना, डाव, झेप घेऊ

23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

बस अपघाताची घटना वेदनादायक ; आ. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली मयत प्रवाशांना श्रध्दांजली

इमेज
  बस अपघाताची घटना वेदनादायक ; आ. पंकजाताई मुंडे यांनी वाहिली मयत प्रवाशांना श्रध्दांजली बीड।दिनांक १९। जालना ते वडीगोद्री मार्गावर मठतांडा (ता.अंबड) येथे झालेल्या  बस व ट्रकच्या भीषण अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायक आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी शोकाकुल भावना व्यक्त करत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    हा अपघात अतिशय दुर्दैवी होता. यात आमचा अंत्यत धडाडीचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय बंडू बारगजे यांचं दुर्दैवी निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले. दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. बंडू बारगजेंसह अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !! मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त करते. तसेच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना करते असं आ. पंकजाताई म्हणाल्या. ••••

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना

इमेज
  अंबड बस-ट्रक अपघाताची घटना वेदनादायी - धनंजय मुंडे जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना परळी वैजनाथ(दि. 20) - गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अंबड जवळ संत्र्याच्या ट्रकने दिलेल्या धडकेत एसटी बस मधील सहा तर ट्रक मधील दोन अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या भीषण अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  याच अपघातात आपला जुना सहकारी, बसचालक बंडू बारगजे यांचे दुःखद निधन झाले असून, त्याबद्दलही धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या एसटी बसला सकाळी नऊच्या सुमारास अंबड जवळ एका संत्र्याच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसचे चालक वाहक व अन्य चार प्रवासी तर ट्रकचा चालक व क्लीनर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 15 ते 20 जण जखमी असून यापैकी नऊ जणांना प्रथमोपचार करून जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जणाची प्रकृती गंभीर अ

अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचेही अखंड मराठा समाजाचे आवाहन

इमेज
  जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन; बीड जिल्हा बंदची हाक अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचेही अखंड मराठा समाजाचे आवाहन बीड: मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला संपूर्ण मराठा समाजाचे समर्थन आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ दि.२१ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील एक वर्षांपासून घरदार सोडून लढा देत आहेत. सुरूवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. यानंतर मुंबईवर मोर्चा काढल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेचे अधिसुचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिलेला होता. तो शब्द अद्यापही पाळलेला नाही. यानंतरही उपोषण करण्यात आलेले असून प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागवून घेतली जात आहे, परंतु शब्द पाळला जात नसल्याने आता सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमातून

कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ म.गांधी जयंती दिवशी तालुकास्तरीय मेळावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे

इमेज
कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ म.गांधी जयंती दिवशी तालुकास्तरीय मेळावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे  मुंबई दि.19 : कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ कृषी विभागातील विविध महामंडळाच्या समन्वयाने दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कृषी विभागांतर्गत विविध महामंडळाच्या समन्वयाने तालुक्यातील मेळावे आयोजित करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, दूरदृष्य प्रणालीद्वारे कृषी संचालक विनयकुमार आवटे व विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्री श्री मुंडे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना विविध माध्यमातून राज्य शासन दरवर्षी किमान 50 हजार रुपये देत आहे तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्या

गणपती सजावट स्पर्धेत प्रिती गणेश फुटके द्वितीय पारितोषिक

इमेज
राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही तर सामाजिक परिवर्तन घडवण्याचे साधन-सौ.राजश्री धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठान आयोजित महालक्ष्मी आरास व गणपती सजावट स्पर्धेत प्रिती गणेश फुटके द्वितीय पारितोषिक, सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)           राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही तर सामाजिक परिवर्तन घडवण्याचे साधन आहे. गौरी गणपती कार्यक्रम धार्मिक आस्था नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवू शकतो असे प्रतिपादन सौ. राजश्री धनंजय मुंडे यांनी केले.          नाथ प्रतिष्ठानच्या वतीने शहरात महालक्ष्मी आरास व गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले होते. यावेळी सौ. राजश्री धनंजय मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमास डाॅ. शालिनी कराड,आघाव व स्पर्धा आयोजन केलेल्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना सौ.राजश्री धनंजय मुंडे म्हणाल्या की, राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही, या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवता येते, उपेक्षित, सामाजिक घटकांसाठी काम करता येते, नाथ प्रतिष्ठानने स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील महिलांसाठी भव

हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती -प्रा. डॉ. विनोद जगतकर

इमेज
  हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती -प्रा. डॉ. विनोद जगतकर  परळी, प्रतिनिधी...जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 व्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ विनोद जगतकर यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण होती असे मत प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. ए आर.चव्हाण ,प्रमुख वक्ते कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील   इतिहास विभाग प्रमुख, डॉ. विनोद जगतकर,विद्या परिषद सदस्य व स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास संशोधन केंद्राचे सदस्य तथा प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. पी एल कराड उपप्राचार्य प्रा डी के आंधळे,प्रा.हरीश मुंडे, IQAC चे समन्वयक डॉ व्ही जे चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्याचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के.शेप यांनी केला. त्यात त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजाम राजवटीने केलेल्या अन्याय अत्याचार विषयी थोडक्यात माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक डॉ जगतकर

श्री चिंतेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित कार्यक्रम संपन्न

इमेज
 श्री चिंतेश्वर विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित कार्यक्रम संपन्न गेवराई (प्रतिनिधी ):भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.         शालेय वाहतूक करणारे ज्येष्ठ चालक श्री महेशजी लाड यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्था.स.स.अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी,प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष डॉ श्री.राधेश्याम झंवर कार्यवाह श्री दत्तात्रय पत्की,श्री अनिल बोर्डे,श्रीम.मोरगांवकर ताई,श्री अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्रीम.मोरगांवकर ताई  यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.प्रमुख उपस्थित श्री महेश लाड यांनी विद्यालयाच्या प्रगती साठी आम्ही सर्व वाहन चालक बंधू सदैव तत्पर असू अश्या भावना व्यक्त केल्या.         अध्यक्षीय समारोपात श्री प्रमोद कुलकर्णी य

कॉ सिताराम येचुरी यांना परळीत सर्वपक्षीय श्रद्धांजली

इमेज
 कॉ सिताराम येचुरी यांना परळीत सर्वपक्षीय श्रद्धांजली   परळी वै ता.१६ प्रतिनिधी        मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ सिताराम येचुरी यांना परळी येथे सोमवारी (ता.१६) शोकसभेत सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.         मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ सिताराम येचुरी यांचे गुरुवारी (ता.१२) दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. कॉ सिताराम येचुरी यांना परळी येथील माकप कार्यालयात सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी (ता.१६) सायंकाळी शोकसभेत श्रद्धांजली वाहिली. माकपचे जेष्ठ नेते कॉ पी एस घाडगे, माकपचे जिल्हा सचिव कॉ अजय बुरांडे, सिटुचे जिल्हाध्यक्ष कॉ बी जी खाडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनिफ बहादुरभाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिवनराव देशमुख, मनसेचे शहराध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी शोकभावना व्यक्त करत कॉ सिताराम येचुरी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी माकपचे शहर सचिव, परमेश्वर गित्ते, शेतकरी संघटनेचे कालीदास आपेट, जेष्ठ नेते उत्तमराव माने, प्रभाकर वाघमोडे, प्रा. अतुल दुबे, कैलास सोळंके, शिवसेनेचे सचिन स्वामी, किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ भगवान बडे, क

वैद्यनाथ नगरीत शिवनामाचा एकच गजर...

इमेज
वैद्यनाथ नगरीत शिवनामाचा एकच गजर... संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामींची परळीत निघाली पालखी; अखंड शिवनाम सप्ताहाची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता सदगुरू श्री सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन; वीरशैव लिंगायत समाज, परळीचा उपक्रम परळी वैजनाथ/प्रतिनिधी वीरशैव लिंगायत समाज परळी व श्री गुरूलिंग स्वामी देवस्थानच्या वतीने दि.7 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या संतश्रेष्ठ श्री गुरूलिंग स्वामी यांच्या 123 व्या पुण्यतिथी महोत्सव व अखंड शिवनाम सप्ताहाची शुक्रवार दि.13 सप्टेंबर रोजी भक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. यानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली. शिवनामाचा एकच गजर, जागोजागी भाविकांकडून श्रीं च्या पालखीवर करण्यात आलेली पुष्पवृष्टी हे या पालखी सोहळयाचे वैशिष्टय असून आजच्या पालखी सोहळयाला शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. सदगुरू श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. सप्ताहात त्यांचे आशिर्वचन पार पडले. आपल्या आशिर्वचनातून महाराजांनी सामाजिक, सार्वजनिक शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व शरीर

पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती - डॉ शशिकांत पट्टेकर

इमेज
  पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था  उद्ध्वस्त झाली असती -  डॉ शशिकांत पट्टेकर परळी/ प्रतिनिधी  पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी अभ्यासक डॉ शशिकांत पट्टेकर यांनी स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी आणि फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सम्राट अशोक सभागृहात प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला थर्मल कॉलनी येथे 'पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२) : 'गाभा आणि वर्तमान स्वरूप' किंवा पुणे कराराचा धिक्कार वारंवार का करावा ? या विषयावर विशेष साप्ताहिक अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी बोलताना केले.   उद्घाटक परळी औष्णिक विद्युत केंद्रांचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड यांनी केले. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे बी. एल. वडमारे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर, अँड कपिल चिंडालिया, लक्ष्मण वैराळ यांचीही उपस्थिती होती.  पुणे कराराला ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. अनुसूचित जाती (पूर्वश्रमीचे अस्पृश्य) व अनुसूचित जमाती (पूर्वाश्रमीचे आदिवासी) यांच्यावर हा पुणे करार
इमेज
ज्ञान,परीश्रम,जिद्द,सातत्य व चिकाटी द्वारे कोणत्याही क्षेत्रात यश मिळते-अतिरिक्त आयुक्त भारत राठोड श्री केदारी महाराज विद्या मंदीर,नंदनज येथे स्पर्धा परीक्षा व क्रिडा क्षेत्रातील मार्गदर्शन परळी वैजनाथ/प्रतिनिधी  परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ज्ञान, परीश्रम, जिद्द, सातत्य व चिकाटीद्वारे कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळते असे प्रतिपादन परळी नगरीचे सुपूत्र सध्या पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले श्री.भारत राठोड यांनी श्री.केदारी महाराज विद्या मंदीर,नंदनज शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील मार्गदर्शन करताना व्यक्त केले.या शाळेच्या मुख्याध्यापकपदी पदोन्तीने शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर तसेच विविध क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे शिक्षक श्री.चेतन सौंदळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल श्री.वैद्यनाथ विद्यालय 89 बॅचच्या वर्गमित्रांच्या वतीेने सत्कार करण्यात आला. यावेळी परळी तालुक्याचे क्रिडा समन्वयक श्री.संजय(पापा) देशमुख सरांनी मनोगत व्यक्त करताना बीड जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थी अॉलम्पिक,आशिया, राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत क्रिडा क्षेत्रात

सिरसाळ्यातील शादीखान्याचे लोकार्पण व महिला सभागृहाचे भूमिपूजनही धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न

इमेज
शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी शेतीबरोबरच पशुपालन या जोडधंद्याकडेही वळावे - धनंजय मुंडे परळी तालुक्यातील मोहा व सिरसाळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण सिरसाळ्यातील शादीखान्याचे लोकार्पण व महिला सभागृहाचे भूमिपूजनही धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न परळी वैद्यनाथ (दि. 15) - परळी मतदारसंघात शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी आपण मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी या सर्वाधिक मंजूर केलेल्या आहेत. त्याचबरोबर शेतीच्या सोबतीने उत्पन्न वाढीसाठी पशुपालनाकडेही जोडधंदा म्हणून बघणे व पशुपालन करणे गरजेचे असल्याचे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील मोहा येथे पशु वैद्यकीय दवाखान्याच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना व्यक्त केले आहे. बीड जिल्ह्यात लंपी आजारावर नियंत्रण असेल किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यांना सुविधा मिळवून देण्याचा विषय असेल आपण 25 कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिलेला असून परळी तालुक्यात सुद्धा सुमारे सहा कोटी पाच लक्ष रुपये इतका निधी आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. जनावरांच्या सोनोग्राफी व एक्स-रे साठी पशुपालकांना पूर्वी इतर जिल्ह्यांमध्ये ज

संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ

इमेज
  एका बाजुला गुड टच आणि बॅड टचचे धडे : दुसर्‍या बाजूला शिक्षकांकडूनच धिंडवडे: उर्दू शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जातात आणि दुसरीकडे एका शिक्षकांकडूनच आपल्याच उर्दू शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना परळीत घडली आहे.परळीतील या संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.               याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील मिस्त्री काम करणाऱ्या एका कामगाराची 12 वर्षीय मुलगी ही बिलाल प्राथमिक शाळा मलिकपुरा येथे शिक्षण घेते. शाळेत असताना तेथील शिक्षक  साजीद सलीम शेख याने या मुलीच्या ड्रेस मध्ये हात घालुन पाठीवर व बगलात हात फिरवला तसेच ती वाचन करीत असताना तिचे बोटावर बोट ठेवुन हात पकडुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. अशी फिर्याद पिडीत मुलीच्या वडीलांनी दिली आहे. परळीतील या संतापजनक प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुरन 141/2024 कलम 74, 75, 79, BNS सह कलम 8,

कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

इमेज
सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्कही वाढवले कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळणार मुंबई दि.१३- सोयाबीनची 90 दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.      राज्यात सोयाबीनचा पेरा 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त झाला असल्याने तसेच यावर्षी पाऊस पाणी व्यवस्थित झाले असल्याने सोयाबीनचे उत्पन्न बंपर होणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी, खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे, अशा मागण

निकटवर्तीयांना चुटपुट लावणारी ह्रदयद्रावक घटना

इमेज
आईच्या दहाव्या दिवशी मुलाचीही संपली जीवनयात्रा ! परळी/प्रतिनिधी - आईच्या दहाव्या दिवशीच मुलाचेही निधन झाल्याची चुटपूट लावणारी एक घटना परळीच्या संत सावता महाराज मंदिर परिसरातील अनंतपुरे गल्लीमध्ये शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी घडली. तारामती लक्ष्मण शिंदे (वय ८०) व बालाजी लक्ष्मण शिंदे (वय ५३), असे निधन झालेल्या माय-लेकराचे नाव आहे. बालाजी शिंदे हे गणेशपार भागात *बम्बईया* या टोपण नावाने परिचित होते. स्कूल ऑटो चालक म्हणून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते व्यवसाय करत होते. ऊन-पाऊस अथवा कितीही कडाक्याची थंडीही असली तरी पहाटे ५ वाजून ५ मिनिटाला शिंदे यांचा ऑटो सुरू व्हायचा. तीच त्यांची ओळख गल्लीतील रहिवाशांमध्ये ठसलेली होती. ऑटो चालवूनच त्यांनी मुलाला इंजिनिअर केले. मुलीलाही उच्चशिक्षित केले. बालाजी शिंदे हे ४ सप्टेंबरला वार्धक्याने इहलोकीची यात्रा संपवलेल्या आईच्या गंगापूजनाचे विधी १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने त्याची सर्व तयारी घरात करत होते. १४ व्या चा गोड जेवणाचा मुख्य विधी सावता महाराज मंदिरात करायचे निश्चित झाले होते. तसे स्थळ, वेळ सांगणाऱ्या छापिल मजकुराच्या व्हॉट्सॲप
इमेज
  परळी- नंदागौळ रस्त्यावर आढळला मृतदेह परळी वैजनाथ ,प्रतिनिधी          परळी - नंदागौळ रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असुन  या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.            एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ३५-४० असलेल्या इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. तो वेडसर असून मागील काही दिवसापासून वैद्यनाथ मंदिर परिसरात फिरत होता. तरी त्याचेबाबत अगर नातेवाईकबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन परळी शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इमेज
  धर्मापुरीकरांना दिलेला शब्द धनंजय मुंडेंनी केला पूर्ण, शादीखाना बांधकामास 1 कोटी रुपये निधी मंजूर परळी वैद्यनाथ (दि. 13) - परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातील धर्मापुरी येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, धर्मापुरी येथे शादीखाना उभारण्यास शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने मंजुरी दिली असून, मुंडेंच्या मागणीनुसार या कामासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.  धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात दिलेले शब्द पूर्ण करण्यावर व पायाभूत सुविधांच्या निर्माणवर अगदी सुरुवातीपासूनच भर दिला आहे.  मागील सुमारे पावणे पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात तीर्थक्षेत्र विकास, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पशु वैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध सुविधा, राष्ट्रीय महामार्गाचे नावन्यपूर्ण निर्माण, शहर बायपास यांसारखी अनेक कामे पूर्ण केली आहेत. त्यातच आता दिलेला शब्द पूर्ण करत धर्मापुरी येथील शादीखान्याचीही भर पडली आहे.  याबद्दल धर्मापुरीचे ज्येष्ठ नेते ऍड.गोविंद फड व

अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

इमेज
अंबलटेक येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      श्री क्षेत्र हनुमान मंदीर अंबलटेक, अंबाजोगाई, जि. बीड येथे श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.              गुरुवार, दि.१२.०९.२०२४ रोजी प्रारंभ होणार असुन बुधवार, दि.१८.०९.२०२४ कथेची सांगता होणार आहे.दररोज सायं. ७.०० ते १० पर्यंत कथेची वेळ असणार आहे.कथाकार श्री.ह.भ.प. रविंद्र महाराज वेताळ, परळीकर यांच्या सुमधूर वाणीतून कथा होईल. या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, अंबलटेक ता. अंबाजोगाई, जि. बीड यांनी केले आहे.
इमेज
  अष्टांग-योगाच्या अनुष्ठानाने जगात सुख- शांतता नांदेल ! वैद्यनाथ" मधील ‘ग्रंथ चर्चा’ उपक्रमात प्रा. डॉ.आचार्य यांचे विचार                  *परळी, दि.११-*                         सद्ययुगात वाढत चाललेल्या सर्व समस्यांवर अष्टांगयोगाचे अनुष्ठान  हाच  उपाय असून योगतत्वांच्या आचरणाने जगात सुख शांतता नांदेल.यासाठी मानवाने नेहमी योगसाधनेला जीवनाचे अंग बनवावे, असे आवाहन अभ्यासक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी व्यक्त केले.                      ‌.                      येथील वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने काल (दि.१०) "ग्रंथचर्चा" हा अभिनव उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफतांना प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आचार्य बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ए. आर. चव्हाण होत्या. तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ.व्ही.बी. गायकवाड, नॅक समन्वयक डॉ. व्ही. जे. चव्हाण, ग्रंथपाल डॉ.एस. ए.धांडे उपस्थित होते.                ‌.                      श्री आचार्य यांनी बी. के. एस. अय्यंगार यांच
इमेज
  मन, वचन व शरीराने इतरांना त्रास न देणे हा खरा यज्ञ, तर मानवाला सुखी ठेवणे हाच खरा धर्म   श्रीमद् भागवत कथेतून स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराजांचे प्रतिपादन. प्रतिनिधी । परळी दि. १२ सप्टेंबर २०२४ दृष्टी व मन शुद्ध करा. मनाला ईश्वराचे स्मरण होण्यासाठी जपाशिवाय अन्य साधन नाही. कर्म हे चित्तशुद्धी साठी आहे तर भक्ती ही मनाच्या एकाग्रतेसाठी असते. चित्त शुद्ध झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा जाणवते. ज्याचे मन निर्मळ असेल, दृष्टी शुद्ध असेल, जो निस्वार्थ मनाने कर्म करत असेल त्याच्यासाठी जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सृष्टीत वावरताना प्रत्येक जिवाला सुखी करणे हाच मानवाचा धर्म आहे. हाच आदर्श वराभ भगवंतांनी आपल्या आचरणातून मानवाला शिकवला आहे. मन, वचन व शरीराने कोणालाही त्रास न देणे हाच खरा यज्ञ आहे तर मानवाला सुखी ठेवणे हा खरा धर्म आहे असे विचार संत साहित्यिक तथा प्रसिद्ध कथाकार स्वामी डॉ.तुळशीरामजी गुट्टे महाराज यांनी तालुक्यातील नंदनंज येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या पुष्पात बोलताना मांडले. जीवनात ज्ञानाची प्राप्ती करणे ही गोष्ट कठीण नाही. ज्ञानप्राप्

श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून हरिहर तिर्थाची तयारी पाहणी

इमेज
  श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून हरिहर तिर्थाची तयारी पाहणी   परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-परळी शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  नगर परिषद व पोलिस प्रशासन यांनी श्रींच्या विसर्जन ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तिर्थाची पाहणी करत यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हवी याबाबत पाहणी केली.  यावेळी शहरातील विविध ठिकाणहून गणेशमूर्तींच्या मिरवणुका व विसर्जन मार्गाची पाहणी केली. श्रींच्या विसर्जनासाठी असलेल्या हरिहर तिर्थात मुबलक पाणी उपलब्ध आहे याच नेहमी प्रमाणे गणेश मुर्तींचे  विसर्जन करावे असे आवाहन ही गणेश मंडळ व घरगुती गणेश भक्तांना प्रशासनाने केले आहे.  नगर परिषदेचे मुख्याधिकारी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गुरुवार दि.12 सप्टेंबर रोजी श्रींच्या विसर्जन ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तिर्थाची पाहणी करत यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हव्या याबाबत उपाययोजना करिता पाहणी केली.          यावर

● असा उलगडला गुन्हा... पोलीस हवालदार नरहरी नागरगोजे यांच्या पुर्वानुभवाने सापडला चोर

इमेज
  बसमध्ये बिस्कीट आणि पाणी देऊन आणली गुंगी: महिलेचे साडेतीन लाखाचे दागिने पळवणारा चोर जेरबंद ! परळीच्या संभाजीनगर पोलीसांनी महिनाभरात उलगडला चोरीचा गुन्हा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी वैजनाथ येथून बस मध्ये प्रवास करत असताना दगडवाडी जवळ बसमधील एका महिलेला एका अनोळखी इसमाने चहा बिस्कीट दिले. त्यानंतर या महिलेला गुंगी आली. त्यानंतर या इसमाने महिलेच्या अंगावरील साडेतीन लाख रुपयांचे दागिने पळून नेल्याची घटना गेल्या आठ ऑगस्ट रोजी घडली होती. या अतिशय गुंतागुंतीच्या व तपासाच्या दृष्टीने क्लिष्ट असलेल्या गुन्ह्याचा परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी महिन्याच्या आत तपास केला व हा गुन्हा उलगडला असून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील  एका चोराला मुददेमालासह जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.           याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार कमल ज्ञानोबा सुरवसे वय 50 वर्ष रा. बसवेश्वर कॉलनी परळी ता. परळी जि.बीड महिला दि.-08/08/2024 रोजी सकाळी 7:30 वा च्या सुमारास परळी बसस्थानक येथून नांदेड येथे जाण्यासाठी परळी ते नांदेड बस मधून प्रवास करत असताना बसमध्ये एका अनोळखी इसमाने या महिलेला बिस्की

श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न

इमेज
  परळीत संतश्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सवास भाविकांची लक्षणीय उपस्थिती श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  वीरशैव समाज परळीच्या वतीने संतश्री गुरूलिंग स्वामी यांचा 123वा पुण्यतिथी महोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह 7 सप्टेंबरपासून भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात सुरू झाला आहे. आज बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाच्या प्रारंभात श्री संतश्री गुरूलिंग स्वामी व संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन श्री व सौ अविनाश शंकरअप्पा चौधरी व दैनिक महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे उपसंपादक श्री व सौ आशिष शंकरअप्पा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली असून, प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा अशा पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम 13 सप्टेंबरपर्यंत आयोजित केले जातील. श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत दत्ताप्पा ईटके गुरूजी व समस्त विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली