श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून हरिहर तिर्थाची तयारी पाहणी
श्रींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून हरिहर तिर्थाची तयारी पाहणी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-परळी शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद व पोलिस प्रशासन यांनी श्रींच्या विसर्जन ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तिर्थाची पाहणी करत यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हवी याबाबत पाहणी केली.
यावेळी शहरातील विविध ठिकाणहून गणेशमूर्तींच्या मिरवणुका व विसर्जन मार्गाची पाहणी केली. श्रींच्या विसर्जनासाठी असलेल्या हरिहर तिर्थात मुबलक पाणी उपलब्ध आहे याच नेहमी प्रमाणे गणेश मुर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन ही गणेश मंडळ व घरगुती गणेश भक्तांना प्रशासनाने केले आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी गुरुवार दि.12 सप्टेंबर रोजी श्रींच्या विसर्जन ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तिर्थाची पाहणी करत यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हव्या याबाबत उपाययोजना करिता पाहणी केली.
यावर्षी प्रतिवर्षा प्रमाणे परळी वैजनाथ शहरात मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीर आवश्यकती यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देणे, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, अग्निशमन व विसर्जन व्यवस्था असणार आहे. हरीहर तिर्थामध्ये मुबलक पाणी असल्यामुळे याठिकाणी नियोजन करण्यात आले असुन सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी गणेश विसर्जन सोहळ्यात सर्वांनी प्रशासनाला मदत करून गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पाडावा असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आर के नाचन , संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे , उपमुख्यधिकारी संतोष रोडे, स्वछत विभागचे प्रफुल्ल साळवे, शंकर साळवे, विकास बनसोडे, विलास हजारी, विष्णू फड पोलिस अमलदार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा