परळी- नंदागौळ रस्त्यावर आढळला मृतदेह
परळी वैजनाथ ,प्रतिनिधी
परळी - नंदागौळ रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असुन या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.
एक अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ३५-४० असलेल्या इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. तो वेडसर असून मागील काही दिवसापासून वैद्यनाथ मंदिर परिसरात फिरत होता. तरी त्याचेबाबत अगर नातेवाईकबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन परळी शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा