हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती -प्रा. डॉ. विनोद जगतकर
हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांची भूमिका महत्वपूर्ण होती -प्रा. डॉ. विनोद जगतकर
परळी, प्रतिनिधी...जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये 76 व्या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ विनोद जगतकर यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण होती असे मत प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. ए आर.चव्हाण ,प्रमुख वक्ते कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख, डॉ. विनोद जगतकर,विद्या परिषद सदस्य व स्व.गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास संशोधन केंद्राचे सदस्य तथा प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. पी एल कराड उपप्राचार्य प्रा डी के आंधळे,प्रा.हरीश मुंडे, IQAC चे समन्वयक डॉ व्ही जे चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्याचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के.शेप यांनी केला. त्यात त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात निजाम राजवटीने केलेल्या अन्याय अत्याचार विषयी थोडक्यात माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक डॉ जगतकर यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांचा सहभाग या विषयावर बोलताना सांगितले की,हैदराबाद संस्थानात स्त्रियांचे स्थान अतिशय हीन दर्जाचे होते. बालविवाह, बालविधवा, अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता, दारिद्र्य, कुपोषण, राजकीय व सामाजिक रूढी-परंपरांच्या विळख्यात ती अडकली होती. इस्लामी संस्कृती व परंपरेचा फार मोठा प्रभाव स्त्रियांवर होता. तरीही हैदराबाद मुक्ती लढ्यात महिलांनी मोलाचे योगदान दिले आहे.सन 1938 ते 1949 या कालखंडात ज्या महिलांनी सहभाग नोंदवला त्यात आशाताई वाघमारे, सुशीलाताई दिवाण, पानकुंवर कोटेचा, सुलोचनाबाई बोधनकर, कावेरीबाई, गोदावरीबाई, लताबाई, उषा पांगुरीबाई, गिताबाई चारठाणकर ,प्रतिभाताई वैशंपायन, दगडाबाई शेळके, तारा परांजपे, करुणाबेन चौधरी, शकुंतला साले इत्यादी महिलांचा सहभाग होता. या महिलांच्या कार्याविषयी संशोधन देखील करता येईल असे त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.ए आर चव्हाण यांनी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघराज्यात विलीन करून घेतले.हैदराबाद राज्याच्या विलीनीकरणासाठी जनतेने जे सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले, हेच आंदोलन भारतीय इतिहासात 'हैदराबादचा स्वतंत्र -संग्राम ' या नावाने ओळखले जाते. हा स्वातंत्र -संग्राम भारतीय स्वातंत्र आंदोलनाचाच एक भाग होता असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी एस सातपुते व आभार डॉ. एम जी लांडगे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्त्तर कर्मचारी उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा