श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न
परळीत संतश्री गुरूलिंग स्वामी पुण्यतिथी महोत्सवास भाविकांची लक्षणीय उपस्थिती
श्री व सौ आशिष चौधरी यांच्या हस्ते आरती व पुजा संपन्न
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी
वीरशैव समाज परळीच्या वतीने संतश्री गुरूलिंग स्वामी यांचा 123वा पुण्यतिथी महोत्सव आणि अखंड शिवनाम सप्ताह 7 सप्टेंबरपासून भाविक भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात सुरू झाला आहे. आज बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाच्या प्रारंभात श्री संतश्री गुरूलिंग स्वामी व संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या प्रतिमांचे विधीवत पूजन श्री व सौ अविनाश शंकरअप्पा चौधरी व दैनिक महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचे उपसंपादक श्री व सौ आशिष शंकरअप्पा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली असून, प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अखंड शिवनाम सप्ताह, पालखी सोहळा, भंडारा अशा पारंपारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम 13 सप्टेंबरपर्यंत आयोजित केले जातील. श्री सदगुरू 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत दत्ताप्पा ईटके गुरूजी व समस्त विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे.
सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 8 वाजता शिव सहस्त्रनामावली, सकाळी 9 ते 11 वाजता परम रहस्य व श्री पलसिद्ध महात्म्याचे पारायण, सकाळी 10.30 ते 12 वाजता श्री मन्मथ स्वामी गाथावरील भजन, दुपारी 3 ते 5 वाजता शिव पाठ आरती व सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजता धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. परम रहस्याचे पारायण प्रमुख शि.भ.प. व्यंकट मारुती आप्पा होनशेटे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा