संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ

 एका बाजुला गुड टच आणि बॅड टचचे धडे : दुसर्‍या बाजूला शिक्षकांकडूनच धिंडवडे: उर्दू शाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जातात आणि दुसरीकडे एका शिक्षकांकडूनच आपल्याच उर्दू शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना परळीत घडली आहे.परळीतील या संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 
             याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील मिस्त्री काम करणाऱ्या एका कामगाराची 12 वर्षीय मुलगी ही बिलाल प्राथमिक शाळा मलिकपुरा येथे शिक्षण घेते.शाळेत असताना तेथील शिक्षक  साजीद सलीम शेख याने या मुलीच्या ड्रेस मध्ये हात घालुन पाठीवर व बगलात हात फिरवला तसेच ती वाचन करीत असताना तिचे बोटावर बोट ठेवुन हात पकडुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. अशी फिर्याद पिडीत मुलीच्या वडीलांनी दिली आहे.परळीतील या संतापजनक प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुरन 141/2024 कलम 74, 75, 79, BNS सह कलम 8, 12 पोक्सो अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधवर पिंक पथक अंबाजोगाई यांच्याकडे देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार