गणपती सजावट स्पर्धेत प्रिती गणेश फुटके द्वितीय पारितोषिक

राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही तर सामाजिक परिवर्तन घडवण्याचे साधन-सौ.राजश्री धनंजय मुंडे

नाथ प्रतिष्ठान आयोजित महालक्ष्मी आरास व गणपती सजावट स्पर्धेत प्रिती गणेश फुटके द्वितीय पारितोषिक, सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण



परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)

          राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही तर सामाजिक परिवर्तन घडवण्याचे साधन आहे. गौरी गणपती कार्यक्रम धार्मिक आस्था नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवू शकतो असे प्रतिपादन सौ. राजश्री धनंजय मुंडे यांनी केले.

         नाथ प्रतिष्ठानच्या वतीने शहरात महालक्ष्मी आरास व गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले होते. यावेळी सौ. राजश्री धनंजय मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमास डाॅ. शालिनी कराड,आघाव व स्पर्धा आयोजन केलेल्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना सौ.राजश्री धनंजय मुंडे म्हणाल्या की, राजकारण केवळ सत्तेचे साधन नाही, या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवता येते, उपेक्षित, सामाजिक घटकांसाठी काम करता येते, नाथ प्रतिष्ठानने स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील महिलांसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यावेळी महालक्ष्मी आरास व गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.या स्पर्धेत पहिले बक्षीस सुनिता भिरु भंडारे (स्कुटी), द्वितीय प्रिती गणेश फुटके (डबल डोअर फ्रिज), तिसरे बक्षीस निता राम पेंटेंवार यांना सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना रोडे, वर्षा दहिफळे व त्यांच्या सहकार्यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !