ज्ञान,परीश्रम,जिद्द,सातत्य व चिकाटी द्वारे कोणत्याही क्षेत्रात यश मिळते-अतिरिक्त आयुक्त भारत राठोड
श्री केदारी महाराज विद्या मंदीर,नंदनज येथे स्पर्धा परीक्षा व क्रिडा क्षेत्रातील मार्गदर्शन
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
परिस्थिती कितीही बिकट असली तरीही ज्ञान, परीश्रम, जिद्द, सातत्य व चिकाटीद्वारे कोणत्याही क्षेत्रात हमखास यश मिळते असे प्रतिपादन परळी नगरीचे सुपूत्र सध्या पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले श्री.भारत राठोड यांनी श्री.केदारी महाराज विद्या मंदीर,नंदनज शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील मार्गदर्शन करताना व्यक्त केले.या शाळेच्या मुख्याध्यापकपदी पदोन्तीने शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर तसेच विविध क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे शिक्षक श्री.चेतन सौंदळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल श्री.वैद्यनाथ विद्यालय 89 बॅचच्या वर्गमित्रांच्या वतीेने सत्कार करण्यात आला.
यावेळी परळी तालुक्याचे क्रिडा समन्वयक श्री.संजय(पापा) देशमुख सरांनी मनोगत व्यक्त करताना बीड जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थी अॉलम्पिक,आशिया, राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत क्रिडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत असून क्रिडा क्षेत्रात परळी तालुक्यातून अधिकाधिक विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी ह.भ.प.अॅड दत्ता महाराज आंधळे यांनी मनोगत केले तसेच सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री.चेतन सौंदळे यांनी सर्व क्षेत्रातील नामवंत,शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,मुख्याध्यापक व गुरूजन तसेच पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत शैक्षणिक गुणवत्तावाढीसह भविष्यातील स्पर्धेत यशस्वी होणारा विद्यार्थी घडविण्याचा कर्तव्यातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी वैद्यनाथ विद्यालय -89 बॅचचे एकनाथ सावजी,अॅड.रमेश साखरे,शिवाजी म्हाळगी,रमाकांत रेवडकर,नरहरी आसेवार,प्रदीप श्रीनिवार,उपेन्द्र धुमाळ,सुशेन दहीफळे,संतोष नावंदर,शिरीष सावजी,अभय लोणीकर,शैलेन्द्र आरविकर,हनुमंत गित्ते,प्रदीप धुमाळ यांची उपस्थिती होती.
शाळेतील शिक्षक श्री.अनिल आदुडे यांनी सुत्रसंचलन केले तर प्रास्ताविक श्री.रामदास नागरगोजे व आभार श्री.गुलाब कदम सर यांनी व्यक्त केले तसेच श्री.एल.पी.फड सर,श्री.मोतीराम पवार सर,श्री.सुरेश तांदळे सर,श्री.गवळी सर,रामेश्वर कस्तुरे सर व दत्ता लोखंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा