इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना

 अंबड बस-ट्रक अपघाताची घटना वेदनादायी - धनंजय मुंडे

जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रशासनास दूरध्वनीवरून सूचना


परळी वैजनाथ(दि. 20) - गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अंबड जवळ संत्र्याच्या ट्रकने दिलेल्या धडकेत एसटी बस मधील सहा तर ट्रक मधील दोन अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजले असून ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या भीषण अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 


याच अपघातात आपला जुना सहकारी, बसचालक बंडू बारगजे यांचे दुःखद निधन झाले असून, त्याबद्दलही धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.


गेवराई वरून जालन्याकडे जात असलेल्या एसटी बसला सकाळी नऊच्या सुमारास अंबड जवळ एका संत्र्याच्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एसटी बसचे चालक वाहक व अन्य चार प्रवासी तर ट्रकचा चालक व क्लीनर अशा एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 15 ते 20 जण जखमी असून यापैकी नऊ जणांना प्रथमोपचार करून जालना येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जणाची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. 


तर किरकोळ जखमी असलेल्या उर्वरित प्रवाशांना अंबड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलीस प्रशासनाकडून अपघाताची माहिती घेऊन जखमींवर योग्य उपचार केले जावेत, याबाबत जालना जिल्हा प्रशासनास आवश्यक सूचना दूरध्वनीवरून केल्या आहेत. 


हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून मयत प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करतो तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी प्रवाशांना देखील योग्य उपचार मिळून त्यांना लवकरात लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना करतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या