पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती - डॉ शशिकांत पट्टेकर
पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती - डॉ शशिकांत पट्टेकर
परळी/ प्रतिनिधी
पुणे करार झाला नसता तर जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाली असती असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी अभ्यासक डॉ शशिकांत पट्टेकर यांनी स्टुडंट्स फॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी आणि फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सम्राट अशोक सभागृहात प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूला थर्मल कॉलनी येथे 'पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२) : 'गाभा आणि वर्तमान स्वरूप' किंवा पुणे कराराचा धिक्कार वारंवार का करावा ? या विषयावर विशेष साप्ताहिक अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी बोलताना केले.
उद्घाटक परळी औष्णिक विद्युत केंद्रांचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड यांनी केले. तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे बी. एल. वडमारे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर, अँड कपिल चिंडालिया, लक्ष्मण वैराळ यांचीही उपस्थिती होती.
पुणे कराराला ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. अनुसूचित जाती (पूर्वश्रमीचे अस्पृश्य) व अनुसूचित जमाती (पूर्वाश्रमीचे आदिवासी) यांच्यावर हा पुणे करार लादून, त्यांच्यामध्ये व्यवस्थेचे चमचे, दलाल निर्माण केले तसेच पुणे करारामुळे SC/ST ची अस्पृश्यता आजही बरकरार राहिली आहे. पुणे करार अप्रत्यक्षरित्या ओबीसी समुदायाशी लागू आहे. कार्यक्रमास उपकार्यकारी अभियंता संदीप गायकवाड, विशाल थोरात, श्याम इंगळे, अतिरिक्त कार्यकारी अधियंता निखिल मेश्राम, संयुक्त उत्सव समितीचे कार्याध्यक्ष महेंद्र रोडे, नगरसेवक केशव गायकवाड, महादेव मस्के, शिवाजी बनसोडे, ज्ञानोबा मस्के, निलावाड सर, कनिष्क कलासरे , चेअरमन निशांत साळवे, प्रशांत मस्के, महेश मुंडे, पत्रकार रानबा गायकवाड, संपादक नितीन ढाकणे, प्रशांत कदम, आकाश देवरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे तर उपस्थितांचे आभार सचिन राऊत यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा