भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची गटनिहाय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड


 प्रतिनिधी (परळी वै.):

                           येथील भा. शि. प्र. संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. भेल संस्कार केंद्रामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाकडे काटेकोरपणे लक्ष पुरविले जाते. हे काम केंद्रातील क्रीडा विभाग अगदी कटाक्षाने अविरतपणे करत आहेत. विद्यार्थी जर शारीरिकदृष्ट्या सदृढ राहिला, तरच त्याला ज्ञानार्जन करणे सोपे जाते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या खेळाकडेही येथे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. *महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय बीड द्वारा आयोजित* परळी येथे तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वय वर्षे 14 व 17 या वयोगटातील भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली.

           या सर्व खेळाडूंना खो-खो खेळातील सर्व बारकावे, विविध योजना, डाव, झेप घेऊन खेळाडूस बाद करणे, साखळी पद्धत, पोल वरील खेळाडूस बाद करणे इ. सारख्या असंख्य गोष्टींचे मार्गदर्शन भेल संस्कार केंद्राचे क्रीडाशिक्षक श्री. यशवंत कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी केले. क्रीडा प्रमुख श्री. लक्ष्मण राडकर सर ,डॉ. श्री. जगदीश कावरे सर व श्री. राजेभाऊ गडदे सर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना लाभले. विजेत्या खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंदन सर्वच थरातून होत आहे. यांची झालेली जिल्हास्तरीय निवड अगदी सार्थ आहे अशीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे.         यानिमित्त संस्कार केंद्राचे श्री. जुगलकिशोर लोहिया (अध्यक्ष,स्थानिक.स.स) श्री. अमोल  डुबे (अध्यक्ष, शा. व्य .स) श्री. जीवनराव गडगूळ (कार्यवाह) श्री. राजेश्वर देशमुख सर,सौ. शोभा भंडारी मॅडम(स) मुख्याध्यापक श्री. गिरीश ठाकूर सर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग यांनीही या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले. अशी माहिती भेल संस्कार केंद्राचे प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रफुल्ल सर यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?